ब्रिटीश खासदाराचा भारत प्रवेश नाकारला

ब्रिटीश खासदाराचा भारत प्रवेश नाकारला

नवी दिल्ली : भारत सरकारच्या काश्मीर धोरणावर व तेथील मानवाधिकार भंगावर टीका करणाऱ्या ब्रिटनच्या लेबर पार्टीच्या खासदार डेबी अब्राहम्स यांना सोमवारी भार

‘काश्मीर धोरणावर टीका केली म्हणून व्हिसा नाकारला’
आमार कोलकाता – भाग २
स्वातंत्र्यलढ्याला निर्णायक वळण देणारी शोकांतिका

नवी दिल्ली : भारत सरकारच्या काश्मीर धोरणावर व तेथील मानवाधिकार भंगावर टीका करणाऱ्या ब्रिटनच्या लेबर पार्टीच्या खासदार डेबी अब्राहम्स यांना सोमवारी भारतात आल्यानंतर त्यांना सरकारने प्रवेश देण्यास नकार दिला. माझ्याकडे व्हिसा असूनही नकार देण्यात आला, असे अब्राहम्स म्हणाल्या. पण विमानतळावरील अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे व्हिसा नसल्याचे कारण पुढे केले.

अब्राहम्स सोमवारी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्या. इमिग्रेशन डिपार्टमेंटमधील अधिकाऱ्यांना त्यांनी पासपोर्टसकट सर्व कागदपत्रे संबंधित दाखवली. त्यांच्याकडे भारतात येण्याचा ई-व्हिसा होता. हा व्हिसा ऑक्टोबर २०२०मध्ये संपणारा होता. पण त्यांच्या व्हिसाची तारीख तपासल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांना १० मिनिटे थांबण्यास सांगितले व नंतर त्यांना ‘डिपोर्टी सेल’कडे जाण्यास सांगितले.

आपल्याला प्रवेश नाकारल्याचे लक्षात आल्यानंतर डेबी अब्राहम्स यांनी भारतातल्या आपल्या एका नातेवाईकाला फोन केला. नंतर ब्रिटीश उच्चायुक्तालयाने या प्रकरणात लक्ष घालण्यास सुरवात केली.

डेबी अब्राहम्स आपल्या व्यक्तिगत कारणासाठी दोन दिवसांसाठी भारतात आल्या होत्या. त्यानंतर त्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाणार होत्या, असे वृत्त द वॉशिंग्टन पोस्टने दिले आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0