‘मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा लवकरच मिळेल’

‘मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा लवकरच मिळेल’

नवी दिल्ली: देशाला मराठी भाषा व साहित्याचा अभिमान आहे, या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी केंद्र सरकारकडून गतीने कार्य होत असून मराठीला लवकरच अभ

आरक्षण आणि नरेंद्र मोदी: श्रीयुत दहा टक्के!
२ ऑक्टोबरपासून काँग्रेसची ‘भारत-जोडो’ यात्रा
तस्करीविरोधी कायद्याने पीडितांच्या हक्कांचे रक्षण करावे

नवी दिल्ली: देशाला मराठी भाषा व साहित्याचा अभिमान आहे, या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी केंद्र सरकारकडून गतीने कार्य होत असून मराठीला लवकरच अभिजात भाषेचा दर्जा देण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी गुरुवारी संसदेत दिली.

राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या सत्रात उपस्थित विषयावर बोलता मेघवाल यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेच्या दर्जाबाबत सुरू असलेल्या कार्यवाहीविषयी माहिती दिली. महाराष्ट्र शासनाचा प्रस्ताव हा सांस्कृतिक मंत्रालयाकडून भाषा तज्ज्ञांच्या समितीकडे पाठविण्यात आला. या समितीचा अहवाल साहित्य अकादमीकडे गेला व तेथे काही त्रुटींची पूर्तता झाली आहे. सध्या, हा प्रस्ताव आंतरमंत्रालय स्तरावर विचाराधीन आहे. केंद्रीय गृह मंत्रालय, सांस्कृतिक मंत्रालय, शिक्षण मंत्रालय आदि मंत्रालयांतर्गत सध्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू असून या विषयाला गती आली आहे. आवश्यक चर्चा व कार्यवाहीनंतर या बाबत निर्णय घेण्यात येईल असे, मेघवाल यांनी सांगितले.

अद्यापपर्यंत देशातील सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने २००४मध्ये अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत मूळ निवेदन निर्गमीत केले होते. तद्नंतर, २५ नोव्हेंबर २००५ रोजी गृहमंत्रालयाने अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला प्राधिकारी संस्था म्हणून जाहीर केले असल्याचेही मेघवाल यांनी यावेळी सांगितले.

शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी पूरक प्रश्नाद्वारे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर भाजपचे खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे आणि काँग्रेसच्या खासदार रजनीताई पाटील यांनी चर्चेत सहभाग घेतला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: