जेएनयुवरून बॉलीवूडमध्ये वादळ

जेएनयुवरून बॉलीवूडमध्ये वादळ

जेएनयुमध्ये विद्यार्थ्यांना गुंडांनी मारहाण केल्याच्या पार्श्वभूमीवर बॉलीवूडचा पाठींबा वाढत आहे, मात्र त्यांना टीकेला तोंड द्यावे लागत आहे.

३७० कलम : सर्व याचिकांची सुनावणी ऑक्टोबरमध्ये
काश्मीर – अदृश्य होत चाललेल्या समस्या
शिवसेनेच्या ‘न–नाटया’तले संदेश

दीपिका पदुकोन या बॉलीवूडच्या अभिनेत्रीने मंगळवारी रात्री जेएनयुत अचानक जाऊन बॉलीवूडला जोरदार धक्का दिला. दीपिका गेली त्यावेळी कन्हैया कुमार घोषणा देत होता. त्यानंतर कन्हैया कुमारचे भाषण झाले. यावेळी दीपिका शांतपणे तिथे उपस्थित होती. गुंडांच्या मारहाणीमध्ये जहामी झालेल्या जेएनएसयुची अध्यक्षा आयेशी घोष हिला, दीपिका भेटली आणि तिची विचारपूस केली. ति तिथे काहीही बोलली नाही.

हेच ते तिकीट

हेच ते तिकीट

त्यानंतर तिच्या विरोधात ट्वीटरवर टीका सुरु झाली. ती आपल्या छपाक या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी तिथे गेली. तिच्या चित्रपटावर आम्ही आता बहिष्कार टाकणार. मी माझे तिकीट रद्द करीत आहे. अशा प्रतिक्रिया सोशल मिडीयावर सुरु झाल्या. छपाकचे ते सोशल मिडीयामध्ये फिरणारे तिकीट एकच असल्याचे व्हिडीओ स्टार ध्रुव राठी यांनी सोशल मिडीयावर सप्रमाण सिद्ध केले.

‘जेएनयू’ मध्ये रविवारी गुंडांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली आणि मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली होती. त्यानंतर जेएनयुतील विद्यार्थ्यांना देशभरातून मोठ्या प्रमाणावर पाठींबा मिळत आहे. ठिकठीकाणी मोर्चे निघत असून, बॉलीवूडमधूनही हळू हळू पाठींबा मिळत आहे.

ती त्या ठिकाणी स्टार असल्यासारखी गेली नाही. काही बोलली नाही. मिडियाचे लक्ष वेधून घेण्यासाठी तिने काही केल्याचे दिसले नाही. दीपिकाने छपाक प्रदर्शित होण्याच्या दोन दिवस अगोदर जेएनयुमध्ये जाऊन एक प्रकारचा धोकाही पत्करला. आपल्या चित्रपटावर बहिष्कार टाकला जाईल, आपल्यला ट्रोल केले जाईल, याचा धोकाही तिने पत्करला आहे. तिच्याबरोबर अनेक अबिनेत्री पुढे आल्या आहेत. मात्र अजूनही तीन खान आणि अमिताभ बच्चन यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. प्रतिक्रिया देण्याच्या दृष्टीने बॉलीवूडमध्ये अभिनेत्यांपेक्षा अभिनेत्री पुढे आहेत.

दीपिकाच्या जेएनयु भेटीनंतर भाजप खासदार साक्षी महाराज यांनी तिच्यावर टीका केली. ते म्हणाले, की ती ‘तुकडे तुकडे गँगची सदस्या आहे. त्यांना परदेशातून पाठींबा आहे.

दीपिकानंतर वरून धवन याने जेएनयुतील विद्यार्थ्यांना पाठींबा दिला. पीटीआयने दिलेल्या बातमीत म्हंटले आहे, की तोंडाला फडके बांधलेले लोक शिक्षण संस्थांमध्ये जाऊन असे करीत असतील, तर ते भयंक आणि दुःखद आहे. अशावेळी आपण तटस्थ राहू शकत नाही, असे वरूण धवन म्हणाला.

रिचा ढ्ढा, स्वरा भास्कर, आलिया भट, सुशांत सिंग यांनीही पाठींबा दिला आहे. विशाल भारद्वाज यांनी तर मुंबईमध्ये एका निदर्शनामध्ये कविता सादर केली आणि विद्यार्थ्यांना पाठींबा दिला. अनुराग कश्यप या दिग्दर्शकाने तर ट्वीटरचा आपला डीपी बदलला असून, केंद्र सरकारवर टीका केली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0