राज्यातील ७ अधिकारी व जवानांना संरक्षण अलंकरण सन्मान

राज्यातील ७ अधिकारी व जवानांना संरक्षण अलंकरण सन्मान

नवी दिल्ली : उल्लेखनीय शौर्य, दुर्दम्य साहस आणि उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते मंगळवारी वर्ष २०२१ चे संरक्षण अलंकरण पुरस्कार

१ फेब्रुवारीचा संसदेवरचा मोर्चा स्थगित
अखेर काश्मीरमध्ये फोर जी इंटरनेट सेवा सुरू
विज्ञान धाब्यावर बसवून रथयात्रेला परवानगी!

नवी दिल्ली : उल्लेखनीय शौर्य, दुर्दम्य साहस आणि उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते मंगळवारी वर्ष २०२१ चे संरक्षण अलंकरण पुरस्कार प्रदान करण्यात आले. मूळचे महाराष्ट्राचे असलेले व सध्याचे हवाई दल प्रमुख विवेक चौधरी यांच्यासह राज्यातील ६ अधिकारी व जवानांनाही या सन्मानाने गौरविण्यात आले.

संरक्षण मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला. मंगळवारी सकाळी आणि सायंकाळी आयोजित या पुरस्कार प्रदान समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी तिन्ही संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख तथा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते अधिकारी व जवानांना कीर्ती चक्र, शौर्य चक्र, वीरचक्र, परम विशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक आदि सन्मानाने गौरविण्यात आले. 

४ परम विशिष्ट आणि २ अतिविशिष्ट सेवा पदक

या समारंभात मूळचे महाराष्ट्राचे असलेले हवाईदल प्रमुख विवेक राम चौधरी यांना उत्कृष्ट सेवेसाठी परम वि‍शिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले. लेफ्टनंट जनरल शशांक ताराकांत उपासनी, लेफ्टनंट जनरल संजय मनोहर लोंढे, व्हाइस ॲडमिरल मुरलीधर सदाशिव पवार यांनाही उत्कृष्ट सेवेसाठी परम विशिष्ट सेवा पदकाने गौरविण्यात आले. लेफ्टनंट जनरल मिलिंद एन. भुरके आणि व्हाइस ॲडमिरल राजेश पेंढारकर यांना उल्लेखनीय सेवेसाठी अतिविशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले.

याच समारंभात ४, मराठा लाइट इन्फ्रंट्रीचे महाराष्ट्राच्या मातीतील मेजर अनिल ऊर्स यांना दुर्दम्य साहसासाठी शौर्य चक्र प्रदान करण्यात आले. वर्ष २०२०च्या जानेवारी महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत मेजर अनिल ऊर्स यांनी कंपनी कमांडर या नात्याने मोहिमेचे नेतृत्व केले होते. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता मेजर ऊर्स यांनी दहशतवाद्यांवर हल्ला चढवत तीन दहशतवाद्यांना ठार केले होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: