देगलूर पोटनिवडणूकः काँग्रेसचे अंतापूरकर विजयी

देगलूर पोटनिवडणूकः काँग्रेसचे अंतापूरकर विजयी

नांदेड, (जिमाका)-  देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी मंगळवारी शांतता व सुव्यवस्थेत पार पडली. मतमोजणीच्या ३० फेऱ्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे

एमआयएम नाही पण काँग्रेससोबत जाऊः प्रकाश आंबेडकर
आझाद यांच्या राजीनाम्याचा भाजपला किती फायदा?
काँग्रेसला संरचनात्मक दुरुस्त्यांची गरज

नांदेड, (जिमाका)-  देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी मंगळवारी शांतता व सुव्यवस्थेत पार पडली. मतमोजणीच्या ३० फेऱ्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जितेश रावसाहेब अंतापूरकर हे  ४१ हजार ९३३ मताच्या फरकाने विजयी झाले.

जितेश अंतापूरकर

जितेश अंतापूरकर

उमेदवारनिहाय मतमोजणीत मिळालेली मते पुढीलप्रमाणे आहेत. जितेश रावसाहेब अंतापूरकर (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १ लाख ८ हजार ८४०),

सुभाष पिराजीराव साबणे (भारतीय जनता पार्टी  ६६ हजार ९०७) , उत्तम रामराव इंगोले (वंचित बहुजन आघाडी ११ हजार ३४८), विवेक पुंडलिकराव केरुरकर (जनता दल (सेक्युलर) ४६७), प्रा. परमेश्वर शिवदास वाघमारे (बहुजन भारत पार्टी १५५), डी. डी. वाघमारे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खोब्रागडे) २१५), अरुण कोंडिबाराव दापकेकर (अपक्ष १४३), गजभारे साहेबराव भीवा (अपक्ष १८३), भगवान गोविंदराव कंधारे (अपक्ष २७४), मारोती लक्ष्मण सोनकांबळे (अपक्ष २४३), विमल बाबूराव वाघमारे (अपक्ष ४९६), कॉ. प्रा. सदाशिव राजाराम भुयारे (अपक्ष ४८६), नोटा (वरीलपैकी कोणीही नाही) (१,१०३), रद्द झालेले मतदान ३० आहे, असे एकूण १ लाख ९० हजार ८९० इतके मतदान झाले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: