मोदीच शहांना खोडून काढत आहेत – विरोधकांची टीका

मोदीच शहांना खोडून काढत आहेत – विरोधकांची टीका

नवी दिल्ली : रामलीला मैदानावर झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनआरसीबाबत दिलेल्या वक्तव्यानंतर विरोध पक्षांनी भाजपवर जोरदार शरसंधान क

या आंदोलनाचा अर्थ काय?
राज्यसभेत ३७० कलम रद्द, जम्मू आणि काश्मीर व लडाख नवे केंद्रशासित प्रदेश
माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमुचे सुरू

नवी दिल्ली : रामलीला मैदानावर झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनआरसीबाबत दिलेल्या वक्तव्यानंतर विरोध पक्षांनी भाजपवर जोरदार शरसंधान केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत एनआरसी होईल असे विधान केले होते पण पंतप्रधान जनतेला बरोबर उलटे सांगत असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली आहे.

दिल्लीतल्या रामलीला मैदानावर झालेल्या जंगी सभेत मोदींनी एनआरसीबाबत ना कॅबिनेटमध्ये चर्चा झाली, ना संसदेत झाली असे विधान केले होते. आसाममध्ये एनआरसी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. आता संपूर्ण देशात एनआरसी राबवली जाणार असल्याचा खोटा प्रचार विरोधी पक्षांकडून पसरवला जात असल्याची टीका मोदी यांनी विरोधकांवर केली. मोदींनी या अप्रचाराला काँग्रेस व प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना जबाबदार धरले होते.

पण ममता बॅनर्जी यांनी मोदीच आपल्या सरकारमधील गृहमंत्र्यांना तोंडघशी पाडत असल्याचे ट्विट केले. अमित शहा केवळ संसदेत नव्हे तर जाहीरपणे देशात एनआरसी केले जाईल असे बोलत आहेत आणि पंतप्रधान जाहीरपणे वेगळेच सांगत असून कोण खरे बोलत आहे, असा सवाल ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केला. जनतेनेच आता याबाबत आपला निर्णय घ्यायची गरज असून भाजप देशाचा मूलभूत ढाचा तोडत असल्याची टीका त्यांनी केली.

राष्ट्रीय एकता परिषदेची काँग्रेसची मागणी

दरम्यान, मोदींच्या रामलीला मैदानातील सभेनंतर काँग्रेसनेही भाजपवर जोरदार हल्ला चढवला असून एनआरसीवर देशात जी काही अस्थिरता पसरली आहे त्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. सरकारने या विषयावर तातडीने राष्ट्रीय एकता परिषद बोलावली पाहिजे अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा यांनी केली आहे.

संसदेत आम्ही एनआरसीच्या धोक्यांबाबत सरकारला इशारे दिले होते, त्यातील त्रुटींना व घटनेला त्यामुळे होणाऱ्या धोक्याबाबत सावध केले होते पण गृहमंत्र्यांनी संसदेच्या दोन्ही सदनात देशभर एनआरसी होईल असे वक्तव्य केले होते, असे शर्मा म्हणाले. हा विषय सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या अखत्यारित गेला असून न्यायालयाच्या निर्णयासाठी थांबावे लागेल असे ते म्हणाले.

‘रिक्षा नको माझे पुतळे जाळा’

दरम्यान, रविवारी दुपारी रामलीला मैदानात झालेल्या जंगी सभेत मोदींनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत विरोधक जनतेला चुकीची माहिती देऊन या कायद्याबाबत अप्रचार व अफवा पसरवत असल्याचा आरोप केला. या कायद्यावर लोकांची मने भडकवली जात आहेत. सार्वजनिक संपत्तीची हानी केली जात आहे, विरोधकांना जर माझा मत्सर वाटत असेल तर त्यांनी माझे पुतळे जाळावेत पण गरीबांचे नुकसान करू नये, त्यांच्या रिक्षा जाळू नये असे विधान त्यांनी केले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: