देशद्रोहाच्या एका प्रकरणात शरजील इमामला जामीन

देशद्रोहाच्या एका प्रकरणात शरजील इमामला जामीन

नवी दिल्लीः जेएनयूतील माजी विद्यार्थी शरजील इमाम याला देशद्रोहाच्या एका प्रकरणात दिल्लीतील स्थानिक न्यायालयाने जामीन दिला. २०१९च्या जामिया मिलिया विद्

‘महाराष्ट्र, शिवसेनासे पंगा लिया हैं’- राऊत आक्रमक
लॉकडाऊन : बाल हक्काची बिकट वाट
सत्ता द्या, ५० रु.ला दारू देऊः भाजपचे आंध्रात आश्वासन

नवी दिल्लीः जेएनयूतील माजी विद्यार्थी शरजील इमाम याला देशद्रोहाच्या एका प्रकरणात दिल्लीतील स्थानिक न्यायालयाने जामीन दिला. २०१९च्या जामिया मिलिया विद्यापीठात दंगल घडवण्याच्या कारस्थानात सहभाग असल्याचा शरजीलवर आरोप आहे. तसेच दिल्लीत दंगल घडवण्याचाही त्याच्यावर आरोप आहे. दिल्ली प्रकरणामुळे शरजील लगेच तुरुंगातून बाहेर येणार नाही. शरजीलला जामीन मंजूर करताना न्यायालयाने ३० हजार रु.चा जातमुचलक्यावर त्याला जामीन देत असल्याचे स्पष्ट केले आहे. शरजीलवर अन्य दोन गुन्हे दाखल असल्याचे त्याचा भाऊ मुजम्मिल इमामने ट्विटरवर म्हटले आहे.

शरजील गेली ३१ महिने तुरुंगात आहे. गेल्या जानेवारी महिन्यात दिल्ली पोलिसांनी शरजीलवर सीएए व एनआरसीविरोधात कथित भडकाऊ भाषण देण्यावरून देशद्रोहाचे आरोपपत्र दाखल केले होते. शरजीलवर जामिया मिलिया विद्यापीठ व अलिगड मुस्लिम विद्यापीठात आसाम व ईशान्य भारताला वेगळे पाडण्याची धमकी दिल्याचा दिल्ली पोलिसांचा आरोप आहे. त्या भाषणावरून पोलिसांनी शरजीलवर यूएपीए व देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले आहेत.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये शरजीलला जामिया हिंसा प्रकरणात व जानेवारी २०२०मध्ये अलिगड विद्यापीठ देशद्रोह प्रकरणात जामीन देण्यात आला होता.

प्रकरणांची पार्श्वभूमी

शर्जिल इमाम जेएनयूमध्ये पीएचडीचा विद्यार्थी असून त्याच्यावर वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी आसाम, उ. प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मणिपूर व दिल्ली अशा ५ राज्यांमध्ये देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते.

१६ जानेवारी २०१९मध्ये अलिगड विद्यापीठातील भाषणात सीएएच्या मुद्द्यावर बोलताना शर्जिल इमामने देशातील कोणतीही राजकीय आघाडी मुस्लिमांच्या बाजूने उभी राहणारी नाही. राज्यघटना मुस्लिमांची सुटका करू शकेल असे समजणेही आत्महत्या करण्यासारखे आहे. अशा परिस्थितीत मुस्लिमांमध्ये निर्माण झालेला संताप वापरला गेला पाहिजे, अशी विधाने केली होती. इमामने असेही म्हटले होते की, आपल्यामागे पाच लाख लोक असतील तर आपण ईशान्येचा भाग कायमचा नाही तरी किमान एक-दोन महिने भारतापासून वेगळा करू शकतो. आसाम और इंडिया कटके अलग हो जाये, तभी ये हमारी बात सुनायेंगेआसाम हा भारताला जोडणारा भाग आहे व तेथे आपली लोकसंख्या अधिक असल्याने आपण असे करू शकतो, असे विधान इमामने केले होते. आपल्या विधानाबाबत ‘द संडे एक्स्प्रेस’ला स्पष्टीकरण देताना इमामने आपण रस्त्यांची नाकाबंदी करण्याबाबत बोललो होतो. ही नाकाबंदी आपण शांततामय मार्गाने करावी, चक्काजाम करावा असे आपले म्हणणे होते, असा खुलासा केला होता.

ऑक्टोबर २०२०मध्ये दिल्लीतील न्यायालयाने इमामचा जामीन अर्ज फेटाळला होता. इमामच्या भाषणातला ध्वन्यार्थ व रोख सार्वजनिक शांतता भंग करणारा, आग भडकवणारा व समाजातील सौहार्दाला धक्का देणारा होता, असे न्यायालयाचे म्हणणे होते.

इमामवर दिल्ली दंगली प्रकरणात यूएपीएअंतर्गतही आरोप आहेत. त्यातील एका जामीन अर्जावरचा निर्णय न्यायालयाने राखून ठेवला आहे.

इमामच्या वकिलांनी अहमद इब्राहिम यांनी इमाम निर्दोष असून तो कोणत्याही हिंसाचारात सामील नव्हता असे न्यायालयाला सांगितले होते. शार्जिलवर लावण्यात आलेले देशद्रोहाचे गुन्हे चुकीचे असल्याचे मत त्याच्या वकिलांनी मांडले होते. शार्जिलचा देशातील न्यायव्यवस्थेवर विश्वास असून तो तपासयंत्रणेला सर्वतोपरी साहाय्य करत असल्याचे त्यांच्या वकिलांनी म्हटले होते.

दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक अपूर्वानंद यांनी केवळ भाषण किंवा लेखन करण्यावर पोलिस देशद्रोहाचा गुन्हा दाखल करू शकत नाहीत असे सर्वोच्च न्यायालयाने अनेक खटल्यावर आपले मत व्यक्त निदर्शनास आणून दिले होते. एखाद्याच्या अशा कृतीने समाजात हिंसा निर्माण झाली तर पोलिस देशद्रोहाचा गुन्हा संबंधितांवर दाखल करू शकतात, पण शर्जिलबाबत असे काही झालेले नाही, असे मत प्रा. अपूर्वानंद यांनी व्यक्त केले होते.

इमाम हा जेएनयूमध्ये आधुनिक भारत या विषयात पीएचडी करणारा विद्यार्थी होता त्या अगोदर त्याने आयआयटी मुंबईतून कम्प्युटर सायन्स शाखेत पदवी घेतली आहे. इमाम दिल्लीतल्या शाहीनबाग आंदोलनातही काही काळ होता.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0