कन्हैयावर खटला चालवण्यास केजरीवाल यांची मंजुरी

कन्हैयावर खटला चालवण्यास केजरीवाल यांची मंजुरी

नवी दिल्ली : मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा युवक नेता कन्हैया कुमारवर देशद्रोहाचा खटला चालवण्यास केजरीवाल यांच्या दिल्ली सरकारने अखेर मंजुरी दिली आहे

शीला दीक्षित यांचे निधन
दिल्लीत सरकार नायब राज्यपालांचेः नवे विधेयक
केजरीवालांचे तीर्थक्षेत्रांचे राजकारण

नवी दिल्ली : मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा युवक नेता कन्हैया कुमारवर देशद्रोहाचा खटला चालवण्यास केजरीवाल यांच्या दिल्ली सरकारने अखेर मंजुरी दिली आहे. कन्हैयावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यासंदर्भात अनेक महिने दिल्ली सरकारकडून टाळाटाळ सुरू होती. हा मुद्दा भाजपकडून सातत्याने लोकसभा व नुकत्याच आटोपलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकांत उपस्थित केला जात होता.

२०१६ साली फेब्रुवारी महिन्यात जेएनयूमध्ये कन्हैया याने देशविरोधात घोषणा दिल्याचा आरोप आहे व त्यासंदर्भात दिल्ली पोलिसांनी जानेवारी २०१९मध्ये कन्हैयाविरोधात आरोपपत्र दाखल केले होते त्यानंतर या फाईलवरून राजकारण सुरू होते.

दिल्ली सरकारच्या मंजुरीमुळे कन्हैया सहीत उमर खालिद, अनिर्बान, आकिब हुसेन, उमर गुल, बशरत अली व खालिद बसीर या अन्य विद्यार्थ्यांवरही देशद्रोह खटल्यासंदर्भात दिल्ली पोलिसांकडून चौकशी होणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0