राणा अयुब यांना परदेशात जाण्यास न्यायालयाची परवानगी

राणा अयुब यांना परदेशात जाण्यास न्यायालयाची परवानगी

नवी दिल्लीः पत्रकार राणा अयुब यांना परदेशात जाण्याची परवानगी दिल्ली उच्च न्यायालयाने दिली आहे. गेल्या ३० मार्चला मुंबईहून लंडनला जात असताना विमानतळावर

सेंट्रल बँकेने २१ हजार कोटी राईट ऑफ केले
‘जालन्यातील २ दलितांच्या हत्येची सीबीआय चौकशी हवी’
‘सीबीआयला काही मिळालं नाही, पण छाप्याची वेळ मजेशीर’

नवी दिल्लीः पत्रकार राणा अयुब यांना परदेशात जाण्याची परवानगी दिल्ली उच्च न्यायालयाने दिली आहे. गेल्या ३० मार्चला मुंबईहून लंडनला जात असताना विमानतळावर राणा अयुब यांना ईडीने लुकआउट सर्क्युलर दाखवत रोखले होते. राणा यांनी कोविड-१९ आर्थिक मदतीचा दुरुपयोग केल्याचे ईडीचे म्हणणे होते व तसे ईमेल समन्स त्यांना पाठवले होते. पण समन्स विमानतळावर अयुब पोहचल्या असताना धाडण्यात आले होते. ईडीच्या अशा अचानक कारवाईवर राणा अयुब यांनी आश्चर्य व्यक्त केले होते.

राणा यांच्याविरोधात हिंदू आयटी सेल नावाच्या एका संस्थेने तक्रार केली होती, त्या तक्रारीवरून ईडीने चौकशी सुरू केली होती.

महिला पत्रकारांवर होणारी हिंसा व त्या संबंधित काही कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी अयुब लंडनला जात होत्या. द वायरला त्यांनी सांगितले की, ३० मार्चला दुपारी तीन वाजता त्यांचे लंडनला जाणारे विमान होते. पण विमान उड्डाणापूर्वी सव्वा तास आधी त्यांना ईमेलद्वारे समन पाठवण्यात आले. या समनचा दाखला देत इमिग्रेशनच्या अधिकाऱ्यांनी अयुब यांना लंडनला जाण्याची परवानगी नाकारली.

राणा यांनी त्यानंतर ३१ मार्चला दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर सुनावणी दरम्यान अयुब यांच्या वकील वृंदा ग्रोव्हर यांनी सांगितले की, अयुब या ईडीच्या कायम संपर्कात आहे व कोणत्याही चौकशीसाठी त्या तयार आहेत. अयुब यांनी सोशल मीडियावर आपण लंडनला जात असल्याचे जाहीर केल्यानंतर २८ मार्चला ईडीने त्यांना लूकआउट नोटीस पाठवली. अयुब यांनी आपण १२ एप्रिलला परतणार असल्याची माहिती दिली पण ईडीच्या वकिलांनी त्या भारतात परत येणार नाही असे न्यायालयात सांगितले. त्यावर न्यायालयाने जर अयुब तुम्हाला चौकशीत साह्य करत नसतील तर त्यांना अटक का केली जात नाही, असा सवाल केला.

ग्रोव्हर यांनी न्यायालयात अयुब यांचे घर मुंबईत असून त्या एकत्र कुटुंबात राहतात, असेही निदर्शनास आणून दिले. अयुब यांच्यावरील सर्व आरोप खोटे व बिनबुडाचे आहेत, असेही त्या म्हणाल्या.

त्यावर न्यायालयाने ईडीचे आरोप खोडून काढत अयुब यांना लंडनला जाण्याची परवानगी दिली.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: