दंगलीमागे विचारवंत, प्राध्यापक, कलावंतः दिल्ली पोलिस

दंगलीमागे विचारवंत, प्राध्यापक, कलावंतः दिल्ली पोलिस

नवी दिल्लीः वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात आंदोलन करणारे निदर्शक, शैक्षणिक संस्थांमधील प्राध्यापक, सामाजिक क्षेत्रात अनेक वर्षे काम करणार

दिल्ली दंगलः दोन सत्यशोधक अहवालांची समीक्षा
सरकारचं नवं हत्यार बुलडोझर !
केजरीवालांचे तीर्थक्षेत्रांचे राजकारण

नवी दिल्लीः वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात आंदोलन करणारे निदर्शक, शैक्षणिक संस्थांमधील प्राध्यापक, सामाजिक क्षेत्रात अनेक वर्षे काम करणारे कार्यकर्ते व कलावंत हे दिल्ली दंगल घडवून आणणार्या कटात सामील असल्याचे दावा दिल्ली पोलिस करत आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार या कटात प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ जयती घोष, दिल्ली विद्यापीठातील प्रा. अपूर्वानंद, स्वराज अभियानचे योगेंद्र यादव, लघुपट निर्माते-दिग्दर्शक राहुल रॉय, माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी ही मंडळी असून या प्रकरणात ताब्यात घेतलेल्या तीन विद्यार्थ्यांनी दिलेल्या जबानीतून आपण हा दावा करत असल्याचे दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे.

मात्र दिल्ली पोलिसांनी या सर्वांवर आरोप ठेवलेले नाहीत. पण या प्रकरणातील मुख्य आरोपी व भाजपचे नेते कपिल मिश्रा यांच्यावर दिल्ली पोलिसांनी अद्याप काहीही कारवाई केलेली नाही.

या अगोदर दिल्ली पोलिसांनी पिंजरा तोड या महिला प्रश्नांसंदर्भात काम करणार्या संस्थेच्या दोन कार्यकर्त्या देवांगना कलिता व नताशा नरवाल, तसेच जामिया मिलिया विद्यापीठातील गुलफिशा फातिमा यांच्यावर दिल्ली दंगल कटात सहभागी असल्याच्या आरोपावरून गुन्हे दाखल केले आहेत.

दिल्ली पोलिसांचा असा दावा आहे की, कलिता व नरवाल या दोघींनी पोलिसांना दिलेल्या जबानीत जयती घोष, अपूर्वानंद, रॉय यांची नावे घेतली असून या सर्वांनी सीएएविरोधात निदर्शने कशी करावीत याचे मार्गदर्शन त्यांना केले होते, असे म्हटले आहे.

पण या दोघींवर दाखल केलेल्या आरोपपत्रातील काही पानांवर कलिता व नरवाल या दोघींना आपल्या स्वाक्षर्या करण्यास नकार दिला होता. हे आरोपपत्र सोशल मीडियावर उपलब्ध आहे.

फातिमा यांच्या जबानीत सीताराम येचुरी, भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर, योगेंद्र यादव, वकील महमूद प्राचा, उमर खालिद, माजी आमदार मतीन अहमद, अनस, सदफ, आमदार अमानतुल्ला खान यांनी निदर्शने कशी करावीत याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले होते, असे दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे.

या संदर्भात सीताराम येचुरी यांनी दिल्ली पोलिसांच्या कार्यशैलीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. दिल्ली पोलिस केंद्रीय गृहखात्याच्या नियंत्रणाखाली व भाजपच्या नेत्यांच्या तालावर काम करत असून विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर वा त्यांच्या शांततापूर्ण आंदोलनाला उत्तर म्हणून सरकार कार्यकर्त्यांना भीती दाखवत असेल तर आम्ही घाबरत नाही, असे येचुरी म्हणाले. आम्ही आणीबाणीच्या विरोधात रस्त्यावर उतरलो होतो व तिचा पराभव केला होता. या कठीण परिस्थितीशी सामना करण्याची ताकद आमच्यात आहे. मोदी सरकार प्रश्नांना उत्तर देता येत नाही म्हणून घाबरते, पत्रकार परिषदेला घाबरते, माहिती अधिकाराला घाबरते, स्वःची डिग्री दाखवायला घाबरते, अशा सरकारच्या धोरणांचा विरोध आम्ही करत राहू, असे येचुरी म्हणाले.

दिल्ली विद्यापीठातील प्रा. अपूर्वानंद म्हणाले, दिल्ली दंगल व भीमा-कोरेगाव प्रकरण यांच्यात साम्य आहे. दोन्ही घटनांमध्ये हिंसा झाली होती आणि मुख्य आरोपींना ताब्यात घेतले गेले नाही वा त्यांची चौकशी केली गेली नाही. दोन्ही प्रकरणामागचे सत्य पोलिसांना उघड करायचे नाही. सरकार सीएएविरोधी आंदोलकांना गुन्हेगार ठरवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे, असे ते म्हणाले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: