संवेदनाशून्य तपास; दिल्ली पोलिसांना २५ हजाराचा दंड

संवेदनाशून्य तपास; दिल्ली पोलिसांना २५ हजाराचा दंड

नवी दिल्लीः दिल्ली दंगलीचा तपास संवेदनाशून्य व हास्यास्पद  असल्याचा ठपका एका स्थानिक सत्र न्यायालयाने दिल्ली पोलिसांवर ठेवत त्यांना २५ हजार रु.चा दंड

हर्ष मंदेर यांचे भाषण चिथावणीखोर नाही
नागरिकत्व कायदा : स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
आरटीआयचा दुरुपयोग : सरन्यायाधीशांच्या दाव्यात तथ्य किती?

नवी दिल्लीः दिल्ली दंगलीचा तपास संवेदनाशून्य व हास्यास्पद  असल्याचा ठपका एका स्थानिक सत्र न्यायालयाने दिल्ली पोलिसांवर ठेवत त्यांना २५ हजार रु.चा दंड ठोठावला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश विनोद यादव यांनी हा दंड ठोठावला आहे.

दिल्ली दंगलीत गोळीबारात मोहम्मद नासिर या व्यक्तीचा डावा डोळा गेला होता. या संदर्भात त्यांनी दिल्ली पोलिसांकडे फिर्याद नोंदवण्याचा प्रयत्न केला होता. पण पोलिसांनी त्यांची फिर्याद दाखल करून घेतली नव्हती. त्यावर न्यायालयाने दिल्ली पोलिसांचा अशा प्रकारचा तपास संवेदनाहीन व हास्यास्पद असल्याचे ताशेरे ओढले.

मोहम्मद नासिर यांनी गेल्या वर्षी १९ मार्चला भजनपुरा पोलिस ठाण्यात नरेश त्यागी, सुभाष त्यागी, उत्तम त्यागी, सुशील, नरेश गौर व अन्य काही जणांविरोधात गोळीबार केल्या प्रकरणात फिर्याद दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी ही फिर्याद दाखल केली नाही. पोलिसांच्या अशा वर्तनाने निराश होऊन नासिर यांनी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला व त्यांच्याकडे फिर्याद दाखल करण्याची मागणी केली.

या दरम्यान दिल्ली पोलिसांनी नासिर यांच्या भागात हिंसाचार झाला होता त्या ठिकाणी ६ अन्य जणांना गोळी लागल्याची फिर्याद नोंद केली होती. ही फिर्याद पर्याप्त असल्याने नासिर यांची स्वतःची फिर्याद नोंद करण्याचे कारण उरत नाही, असा युक्तीवाद न्यायालयात केला होता. या गोळीबार घटनेची पूर्ण चौकशी होत असून गोळीबार करणार्यांची ओळख पटली आहे व त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात येईल, असे न्यायालयाला सांगितले.

पण न्यायालयाने दिल्ली पोलिसांचा हा युक्तीवाद फेटाळत ३ जून २०२०मध्ये नासिर यांनी दाखल केलेली फिर्याद पोलिसांनी नोंद केली नाही असे निदर्शनास आणून दिले. नासिर यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचेही तक्रारीत म्हटले होते. त्या तक्रारीकडे दिल्ली पोलिसांनी दुर्लक्ष केले असा ठपका ठेवला.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: