दंगलप्रकरणी ‘आप’च्या ताहीर हुसेन यांच्यावर गुन्हा दाखल

दंगलप्रकरणी ‘आप’च्या ताहीर हुसेन यांच्यावर गुन्हा दाखल

नवी दिल्ली : इंटेलिजन्स ब्युरोचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या हत्येच्या आरोपावरून व दिल्लीतील दंगल, हिंसाचार फैलावण्याप्रकरणात आम आदमी पार्टीचे नगरसेव

केजरीवाल यांचा पारंपरिक सिद्धांतांना छेद
भाजपची घोडदौड कायम; आप दाखवू शकतो विरोधीपक्षांना मार्ग
प्रमुख विरोधी पक्ष म्हणून आप काँग्रेसला पर्याय देऊ शकतो का?

नवी दिल्ली : इंटेलिजन्स ब्युरोचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या हत्येच्या आरोपावरून व दिल्लीतील दंगल, हिंसाचार फैलावण्याप्रकरणात आम आदमी पार्टीचे नगरसेवक ताहीर हुसेन यांच्यावर गुरुवारी रात्री गुन्हे दाखल करण्यात आले. मृत अंकित शर्मा यांच्या वडिलांनी ताहिर हुसेन आपल्या मुलाच्या मृत्यू प्रकरणाला जबाबदार असल्याचा बुधवारी आरोप केला होता. तशी तक्रारही त्यांनी दिल्ली पोलिसांकडे दाखल केली होती. त्या तक्रारीची दखल घेत ताहीर हुसेन यांच्या विरोधात फिर्याद दाखल करण्यात आली. आता हे प्रकरण क्राइम ब्रँचकडे सोपवण्यात आले आहे.

दिल्ली पोलिसांनी ताहीर हुसेन यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर आम आदमी पार्टीने चौकशीतून सत्य येईपर्यंत त्यांचे पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व रद्द केले आहे.

दरम्यान, गुरुवारी पोलिसांनी ताहीर हुसेन यांचे चांद बाग भागातील घर सील केले. या घरात त्यांचा एक कारखानाही होता. २४ फेब्रुवारीला पेटलेल्या दंगलीत ताहीर हुसेन यांच्या घरातून पेट्रोल बॉम्ब व दगडफेक करण्यात आल्याचे व्हीडिओ व्हायरल झाले होते. पोलिसांनी ताहीर हुसेन यांचे घर तपासले असता त्यांना तेथे मोठ्या प्रमाणात पेट्रोल बॉम्ब व विटा-दगड आढळून आले होते.

पोलिसांनी घरावर छापा टाकला त्यावेळी ताहीर घरात नव्हते. पण त्यांनी एनडीटीव्हीशी बोलताना आपण व्हीडिओत दिसत असलो तरी दंगल शमवण्यासाठी आपण प्रयत्न करत होतो. माझ्या घरापुढे मोठ्या प्रमाणात दंगलखोर जमा झाले होते व त्यावेळी पोलिसांना बोलावण्याचा प्रयत्न मी सतत करत होतो. माझ्या घरात घुसलेल्या दंगलखोरांना हटवण्यासाठी मी हातात काठी घेतली होती आणि अंकित शर्मा यांच्या हत्येत माझा सहभाग नाही असे स्पष्ट केले. भाजपचे नेते मला बदनाम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: