मोदींचे मौन सुटले; काँग्रेसने मागितला शहांचा राजीनामा

मोदींचे मौन सुटले; काँग्रेसने मागितला शहांचा राजीनामा

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व त्यांच्या कुटुंबियांचा मंगळवारी रात्री भारतदौरा आटोपल्यानंतर बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्

‘गोली मारो..’ म्हणणाऱ्या ३ भाजप कार्यकर्त्यांना अटक
काश्मीर : जनतेला भ्रमित करणारा प्रचार सुरूच !
‘शहांचे बांगलादेशाबद्दलचे ज्ञान मर्यादित’

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व त्यांच्या कुटुंबियांचा मंगळवारी रात्री भारतदौरा आटोपल्यानंतर बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत तीन दिवस सुरू असलेल्या दंगलीवर आपले मौन सोडले. दिल्लीतील अनेक भागात पसरलेल्या हिंसाचाराची चौकशी व पाहणी दिल्ली पोलिस व अन्य यंत्रणांकडून सुरू असून दिल्लीतील माझ्या सर्व बांधवांनी शांतता व सलोखा राखावा असे आवाहन मोदींनी ट्‌विटद्वारे केले आहे. शांती व सौहार्द हे आपले खरे चारित्र्य आहे. दिल्लीत शांतता व सामान्य जनजीवन पूर्वपदावर लवकरच येईल असेही ते म्हणाले.

गेल्या रविवारपासून दिल्लीच्या ईशान्येकडे मोठ्या प्रमाणात हिंसाचार होऊन २७ जण ठार झाले आहेत पण हिंसाचाराला रोखण्याचे दिल्ली पोलिसांनी विशेष प्रयत्न केले नाहीत. जमावाच्या हातात काठ्या, बांबू, रॉड, गावठी पिस्तुले असून घराघरात, दुकानांमध्ये घुसून लोकांना लक्ष्य केले जात आहे. कोट्यवधी रुपयांच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यात आले आहे, तरीही दिल्ली पोलिसांनी दंगल आटोक्यात आणण्यासाठी कोणतीही धडककृती आखलेली नाही. अनेक ठिकाणी दिल्ली पोलिसांच्या समक्ष दंगल होत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

अमित शहांनी राजीनामा द्यावा – काँग्रेसची मागणी

गेले तीन दिवस दिल्ली जळत असल्याप्रकरणात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारला जबाबदार धरत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दंगलीची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.

बुधवारी पक्ष कार्यकारणीची एक बैठक होऊन त्यात प्रस्ताव संमत झाला. हा प्रस्ताव सोनिया गांधी यांनी पत्रकारांपुढे सादर करताना दिल्लीतील हिंसा हा एक सुनियोजित षडयंत्राचा भाग असून भाजपचे नेते भडकाऊ घोषणा, भाषणे देत विद्वेष व भयाचे वातावरण वाढवत आहेत आणि ७२ हून अधिक तास दिल्ली पोलिस मूग गिळून सर्व पाहात होती. ही दंगल थांबवण्यात दिल्ली पोलिस अपयशी ठरले आहेत, गृहमंत्री अपयशी ठरले आहेत, असा आरोप त्यांनी केला. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी हिंसाचारग्रस्त भागाची पाहणी केली पाहिजे व तेथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी शांती समितीची स्थापना केली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

हिंदू-मुसलमानांना मारून कोणाचा फायदा झाला?

तीन दिवस दिल्ली जळत असताना दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी एकदाही दंगलग्रस्त परिसराला भेट दिली नाही. पण बुधवारी त्यांनी विधानसभेत दिल्लीत झालेला हिंसाचार बाहेरच्या लोकांनी केला होता असा आरोप करत या दंगलीत कोणी ना कोणी मारले गेले आहे. राहुल सोळंकी मारला गेला कारण तो हिंदू होता, जाकीरही मारले गेले कारण ते मुस्लिम होते, या अशा मारण्याने हिंदू मुस्लिमांना काहीही फायदा झाला नाही, अशी झालेल्या घटनेवर प्रतिक्रिया दिली.

दिल्लीला अशा मत्सराची घृणा आलेली आहे, हे शहर असे आता काही सहन करू शकत नाही. सर्व दिल्लीने अशा जातीय राजकारणाविरोधात उभे राहिले पाहिजे, भावा-भावाशी लढण्यास सांगणारे राजकारण सहन केले जाणार नाही, असेही ते म्हणाले.

केजरीवाल यांनी दंगलीत मारले गेलेले दिल्ली पोलिस दलातील हेड कॉन्स्टेबल रतन लाल यांच्या कुटुंबियांना एक कोटी रु. रकम साहाय्य निधी म्हणून दिली जाईल अशीही घोषणा केली.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: