कोरोना रोखण्यात महाराष्ट्र अपयशीः हर्षवर्धनांची टीका

कोरोना रोखण्यात महाराष्ट्र अपयशीः हर्षवर्धनांची टीका

नवी दिल्लीः महाराष्ट्राने कोरोना लशींचा तुटवडा भासत असल्याचे केंद्राला सांगितल्यानंतर बुधवारी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी महाराष्ट्राचे म्हण

बिहारच्या ऊसाला नेपाळमध्ये मागणी
जेम्स वेब दुर्बीण सूर्याच्या कक्षेच्या नजीक
सार्वजनिक क्षेत्र, कार्यक्षमता व डाव्यांची युनियन वगैरे

नवी दिल्लीः महाराष्ट्राने कोरोना लशींचा तुटवडा भासत असल्याचे केंद्राला सांगितल्यानंतर बुधवारी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी महाराष्ट्राचे म्हणणेच खोटे असल्याचा आरोप केला. महाराष्ट्र सरकार गेल्या वर्षभरात चुकीच्या पद्धतीने काम करत असून ठाकरे सरकारच्या उदासिन भूमिकेमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात हे राज्य पूर्ण अपयशी ठरले असून त्यामुळे ते लक्ष भरकटवण्यासाठी जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत असल्याचा आरोप हर्षवर्धन यांनी केला. आपण गेले वर्षभर आरोग्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचे काम पाहात आहोत, या राज्याची प्रत्येक गोष्टीत चालढकल सुरू आहे. त्यामुळे कोरोना विषाणूविरोधातील देशाच्या लढाईला महाराष्ट्रामुळे धक्का बसत असून त्याने देशाची मान खाली गेल्याचा गंभीर आरोपही हर्षवर्धन यांनी केला.

हर्षवर्धन यांच्या पाठोपाठ केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही उद्धव ठाकरे यांनी लशीच्या पुरवठ्यावरून राजकारण करू नये, असा सल्ला दिला.

महाराष्ट्राला केंद्राने १ कोटी लशीचा खुराक पाठवला आहे, त्या पैकी ९० लाख खुराक शिल्लक आहेत व राज्यात अद्याप १६ लाख कोरोना लसीचे खुराक नागरिकांना देणे बाकी आहेत, अशा परिस्थितीत केंद्राने आणखी ७ लाख खुराक पाठवले आहे. हा आकडा राज्याला रोज पाठवल्या जाणार्या खुराकाएवढा आहे, असे स्पष्टीकरण केंद्राने दिले आहे.

मंगळवारी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात केवळ तीन दिवस पुरेल इतक्या कोरोना लसींचा साठा शिल्लक असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांसोबत झालेल्या व्हीडिओ क़ॉन्फरन्स बैठकीत सांगितले होते. लसींचा तुटवडा असल्याने अनेक ठिकाणच्या लसीकरण मोहीम थांबवावी लागत असल्याचे टोपे यांनी केंद्राच्या निदर्शनास आणून दिले होते. ७ एप्रिलपर्यंत १४ लाख लशींचा खुराक उपलब्ध आहे. दररोज राज्यात ५ लाख लसी देण्यात येतात व आठवड्यात ४० लसींची गरज असते. सध्या लसींचा तुटवडा असल्याने लसीकरण केंद्रे बंद पडत असल्याचे टोपे यांचे म्हणणे होते.

या नंतर केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार यात वाद सुरू झाला. आता केंद्राने राज्याला ७ लाख ४३ हजार २८० लशींचा खुराक बुधवारी पाठवल्याचे सांगितले. त्यामुळे राज्याकडे २३ लाख लशींचा खुराक शिल्लक असल्याचा केंद्राचा दावा आहे.

दरम्यान महाराष्ट्रात मंगळवार ते बुधवारी रात्रीपर्यंत एकाच दिवसात कोरोनाच्या नव्या ६० हजार रुग्णांची भर पडली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0