धीरज मिश्रा, सीमा पाशा यांना रामनाथ गोएंका पुरस्कार

धीरज मिश्रा, सीमा पाशा यांना रामनाथ गोएंका पुरस्कार

प्रशासन व राजकारण या क्षेत्रातील घटनांचे उल्लेखनीय वार्तांकन केल्याबद्दल धीरज मिश्रा व सीमा पाशा या दोन पत्रकारांची भारतीय पत्रकारितेतला प्रतिष्ठेचा र

तडफडणाऱ्या रुग्णांची रामदेवबाबांकडून थट्टा
शोपियन एनकाउंटरमध्ये आमची चुकीः लष्कराची कबुली
सबकुछ प्वाटिए, टू सर विथ लव्ह

प्रशासन व राजकारण या क्षेत्रातील घटनांचे उल्लेखनीय वार्तांकन केल्याबद्दल धीरज मिश्रा व सीमा पाशा या दोन पत्रकारांची भारतीय पत्रकारितेतला प्रतिष्ठेचा रामनाथ गोएंका पुरस्कारासाठी निवड झाली आहे. या दोघांचे वृत्तांकन द वायरमध्ये प्रसिद्ध झाले होते. धीरज मिश्रा यांना डिजिटल मीडिया तर सीमा पाशा यांना ब्रॉडकास्ट मीडिया या विभागासाठीचा रामनाथ गोएंका पुरस्कार मिळाला आहे.

भारतातील संसदीय सदस्य त्यांच्या प्रवासावर व अन्य गोष्टींवर भरपूर पैसा खर्च करत असतात. हा पैसा सर्वसामान्य जनतेच्या खिशातून जात असतो. हा पैसा खर्च करताना संसदीय समितीने घातलेल्या नियमांना खासदारांकडून कशी बगल दिली जाते याचे साद्यंत पुरावे असलेली अनेक वृत्ते धीरज मिश्रा यांनी दिली होती. आपल्या वृत्तांच्या पुराव्यासाठी मिश्रा यांनी प्रत्येक सरकारी खात्याला ३० ते ३५ माहिती अधिकार अर्ज धाडले होते. या माहिती अधिकार अर्जाला मिळालेल्या उत्तरातून खासदारांकडून होणारी उधळपट्टी निदर्शनास आली होती. द वायरमध्ये प्रसिद्ध झालेल्या या वृत्तांची दखल घेत लोकसभा कार्यालयाने खासदारांच्या खर्चावर बंधने आणली होती. धीरज मिश्रा यांची ही पत्रकारिता उल्लेखनीय असल्याचे प्रशस्ती पत्र इंडियन एक्स्प्रेस समुहाने गोएंका पुरस्कार घोषित करताना दिले आहे.

अन्य पत्रकार सीमा पाशा यांनी २०१९मध्ये दिल्लीत उसळलेल्या दंगलीचे वृत्तांकन केले होते. त्यांनी जामिया नगर परिसरात उसळलेल्या दंगलीचे, सीएएविरोधी कायद्यांना होत असलेला विरोध, सीएए कायदाविरोधात जामिया मिलिया विद्यापीठातील पोलिसांची विद्यार्थ्यांवरील कारावाई यांचे वृत्तांकन इनसाइड जामिया नगर या लघुचित्रपटात केले आहे. दिल्लीत गरीब मुस्लिम वस्त्यांकडे पोलिस नेहमी कसे साशंक नजरेने पाहतात, या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न पाशा यांनी आपल्या लघुचित्रपटाद्वारे केले आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0