‘दीदी ओ दीदी’

‘दीदी ओ दीदी’

नवी दिल्लीः ‘दीदी ओ दीदी’ या तीन शब्दांत प. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने मिळवलेल्या दणदणीत विजयाचे सार आहे. निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र म

पोलिसांसमोर युवकाचा जामियातील विद्यार्थ्यांवर गोळीबार
हिंदी: हिंदुत्ववाद्यांच्या हातातील ध्रुवीकरणाचे नवीन शस्त्र
काश्मीर : जनतेला भ्रमित करणारा प्रचार सुरूच !

नवी दिल्लीः ‘दीदी ओ दीदी’ या तीन शब्दांत प. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने मिळवलेल्या दणदणीत विजयाचे सार आहे. निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी यांच्याविषयी काढलेल्या अनुद्गाराचा वचपा प. बंगालच्या जनतेने काढला व ममता दीदींच्या पारड्यात विक्रमी मते टाकली.

पण याचवेळी भाजपने गेल्या विधानसभा निवडणुकांच्या तुलनेत यंदा ३ जागांवरून ७७ जागांपर्यंत झेप घेतली आहे हेही लक्षात घेतले पाहिजे. इतक्या जागा जिंकून भाजपने राज्यात प्रमुख विरोधी पक्ष म्हणून स्थान मिळवले आहे.

प. बंगालची निवडणूक ही भाजपने अत्यंत प्रतिष्ठेची केली होती, या प्रतिष्ठेच्या पायी त्यांनी स्वतःचा दारुण पराभवही करून घेतला. भाजपची अजस्त्र प्रचार यंत्रणा, त्यात निवडणूक आयोगाची पक्षाला असलेली साथ, पंतप्रधान, गृहमंत्री व केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रचारात थेट उडी मारणे, ममतांवर भ्रष्टाचारापासून, धर्मांध, सत्तालोभी असल्याचे सतत केलेले आरोप या सर्वांना परतावून ममतांनी नेत्रदीपक विजय मिळवणे ही ऐतिहासिक घटना म्हटली पाहिजे.

२०१९च्या लोकसभा निवडणुकांत भाजपने ४२ जागांपैकी १८ जागा जिंकल्या. या १८ लोकसभा जागांमध्ये १२१ विधानसभा मतदारसंघ असून या जागा भाजपने जिंकल्या तर त्यांच्याकडे राज्याचे अर्धे बहुमत येते असे सांगितले जात होते. पण प्रत्यक्षात विधानसभा निवडणुकांत भाजपने १२१ पैकी ६० जागा जिंकल्या व त्यांची मतदानाची टक्केवारी दोन वर्षांत १० टक्क्याने खाली आली आहे.

ही भाजपच्या दृष्टीने अत्यंत शरमेची बाब झाली व खुद्द पंतप्रधानांना एका मुख्यमंत्र्याकडून दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. अनेक राज्यात भाजपकडे करिष्मा असलेला नेता नाही तेथे त्यांना पंतप्रधानांना घेऊन लढावे लागते ही सुद्धा नामुष्कीची बाब आहे.

२०१९मध्ये बिहारमध्ये भाजपला असाच अनुभव आला. तेथे त्यांना महागठबंधनचे तरुण नेते तेजस्वी यादव यांना आव्हान देण्यासाठी मोठ्या प्रमाणात शर्थ करावी लागली. मोदी हेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत अशा प्रकारची भाजपची ही व्यूहरचना येथे रचण्यात आली. पण नंतर तिथे अस्मिता, राष्ट्रवाद व जाती याचा आधार भाजपला घ्यावा लागला. हिंदी पट्ट्यात अशा स्वरुपाच्या राजकारणाला यश मिळते हे गणित भाजपने आत्मसात केले व कशीबशी सत्ता मिळवली.

२०१५च्या बिहारच्या निवडणुकांत निवडणूक व्यूहरचनाकार प्रशांत किशोर यांच्या आय-पॅक टीमची महत्त्वाची भूमिका होती. ती भूमिका त्यांनी प. बंगालच्या निवडणुकांत पार पाडली. ६ वर्षांपूर्वी बिहारमध्ये नितीश कुमार व लालू प्रसाद यादव यांच्यात सख्य राहावे म्हणून प्रशांत किशोर यांची भूमिका महत्त्वाची होती. त्या स्वरुपाचे प्रयत्न त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या सोबत केले. प्रशांत किशोर यांच्या टीमने तृणमूलची संरचना मजबूत केली, त्यांच्या टीमने तळागाळात जाऊन समाजमनाचा कानोसा घेतला. संशोधन केले. बंगालमधील दलित, आदिवासी जागांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा असलेल्या वरचष्माचा मुकाबला करण्यासाठी त्यांनी जातीय गणितांचा हुशारीने आधार घेतला, असे तृणमूलच्या एका कार्यकर्त्याने सांगितले.

‘दीदी के बोलो’ या कार्यक्रमातून लोकांच्या प्रश्नांना ऐकण्याचे, त्यांच्या समस्या सोडवण्याचे काम सुरू केले. ‘दुआरे सरकार’ हा प्रशांत किशोर यांनी सुरू केलेल्या मोहिमेतून सरकारच्या विकासवादी योजना लोकांपर्यंत पोहोचवल्या गेल्या. तृणमूलवर भ्रष्टाचाराचे जे आरोप केले जात होते, त्यावर तोडगा काढण्यासाठी अनेक विद्यमान आमदारांना तिकीट न देण्याविषयी पक्षातील प्रमुख नेत्यांचे मन वळवण्याचे काम प्रशांत किशोर यांनी केले. त्याच बरोबर ज्या मतदारसंघात दलित व आदिवासी मतांचा परिणाम असतो त्या मतदारसंघावर अधिक लक्ष दिले.

या निवडणुकांत भाजपच्या ताब्यात असलेले मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्याची तृणमूलची व्यूहरचना होती. उदाहरण जंगलमहालचे घेता येईल. येथील बंकुरा, पुरुलिया, झारग्राम व प. मिदनापूर या चार लोकसभा मतदारसंघातील दलित व आदिवासी मते अत्यंत महत्त्वाची होती. २०१४मध्ये ममता यांनी डाव्यांच्या ताब्यातील हे मतदारसंघ हिसकावून घेतले होते. पण २०१९च्या लोकसभा निवडणुकांत भाजपने तेथे मुसंडी मारून हे मतदारसंघ आपल्या ताब्यात घेतले होते.

या मतदारसंघात भाजप व संघाने जात व अस्मितेच्या नावावर आपला मतदार उभा केला होता. प्रशांत किशोर यांच्या आयपॅकच्या माध्यमातून तळागाळातल्या समाजाच्या धारणा तृणमूलने समजावून घेतल्या. आयपॅकने तयार केलेल्या व्यूहरचना तृणमूलने वापरण्यात सुरूवात केली.

उदाहरण द्यायचे तर पुरुलिया येथे अमित शहा यांची तर जंगलमहाल येथे अमित शहा व नरेंद्र मोदी यांच्या मोठ्या प्रचारसभा भाजपने घेतल्या. या प्रचारसभेत या दोन्ही नेत्यांनी सत्तेवर आल्यास प्रत्येक आदिवासी जमातीसाठी आदिवासी विकास मंडळ स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली. त्याला उत्तर म्हणून तृणमूलच्या उमेदवारांनी मोदी शहा यांच्या कपोलकल्पित आदिवासी विकास मंडळापेक्षा सरकारच्या सुरू असलेल्या आदिवासी व अनु.जातींतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणार्या ‘शिक्षाश्री’, आदिवासींना पेन्शन देणारी ‘जय जोहार’, दलितांसाठीची ‘तापोसिली बंधू’ या योजना राज्य सरकारकडून अस्तित्वात आहेत, असे मतदारांना सांगण्यात येऊ लागले.

तळागाळातल्या समस्या, प्रश्नांची नोंद, त्यांवरचे उपाय, चुकांच्या दुरुस्त्या ही आयपॅकची व्यूहरचना पक्षानेही मनावर घेतली. त्यात व्हीलचेअरवर बसण्याची वेळ आल्यानंतर ममता दीदींनीही आपल्या प्रयत्नात कसूर केली नाही. त्यांचे बंगालच्या महिला मतदारांमधील असलेले अपिल महत्त्वाचे होते. महिलांशी त्यांचा असलेला थेट संबंध, महिला सबलीकरणाच्या योजना बाबत ममतांचा असलेला आग्रह व त्यांच्याकडून प्रश्नांची होणारी सोडवणूक पाहून राज्यात महिला शक्ती दिसून आली.

दुसरीकडे मोदी-शहा यांच्या प्रचार यंत्रणांना महुआ मोईत्रा सारख्या महिला खासदाराकडून दिले जाणारे सडेतोड उत्तर हाही प्रत्येक मतदारसंघात मतदारांशी जोडण्याचा प्रयत्न होता. जिल्हावार महिला समित्यांच्या माध्यमातून मोदी-शहा यांच्या प्रचाराला आक्रमक प्रत्युत्तर दिले जात होते.

तृणमूलला विक्रमी यश मिळाल्यानंतर मोऊ सेनगुप्ता या जिल्हा महिला समितीतील पदाधिकार्याने प्रतिक्रिया दिली- ‘मोदीजी तुम्ही दीदीला घाबरवू शकत नाही पण त्या तुमच्या कुणा मित्राला सहज घाबरवू शकतात’.

तृणमूलची ‘बांगला निजेर मेयेकी छाये’ (बंगालला तिची मुलगी हवी आहे) ही घोषणाही जनतेला साद घालणारी होती.

तृणमूलने भाजप हा बाहेरच्यांचा पक्ष असल्याचे सांगत हा पक्ष बंगाली भाषा व संस्कृतीचे सोंग घेतोय असा प्रचार केला. मोदींसारख्या नेत्यांनी बंगाली वेशभूषा वा दिसण्याचे केलेले प्रकार, त्यांची कोलकातामध्ये उभी केले गेलेले भव्य फलक हे हास्यास्पद प्रकार होते. आम्हाला मोदींनी सांगितलेले ‘अशोल पोरिबर्तन’ नको होते, अशी प्रतिक्रिया सेनगुप्ता या देतात.

बहुतांश पत्रकारांना भाजपचे बंगालमध्ये घट्ट पाय रोवलेले दिसून आले. त्यांचा प्रचार दिसून आला. पण बंगालमध्ये सुमारे ३० लोकसंख्या मुस्लिम असून ती मते तृणमूलकडे गेली. भाजपच्या वाट्याला काहीही आले नाही. त्यातून स्पष्ट दिसतेय की भाजपला मिळालेली ३८.७ टक्के ही मुस्लिमेतर आहेत. या मतातून भाजपला ७७ जागा मिळालेल्या आहेत.

मी या निवडणूक प्रचारात अधिक वेळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ सदस्य हरिपाद सिंग रॉय यांच्यासोबत घालवला. जेव्हा सर्व निकाल आले तेव्हा मी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. ते म्हणाले, भाजपच्या काही चुका पक्षाला भोवल्या. तृणमूलमधून आलेल्या अनेक नेत्यांना उमेदवारी दिल्याने पक्ष कार्यकर्ते नाराज झाले व त्याचा परिणाम आता दिसून येतो आहे. पण या निवडणुकांच्या निमित्ताने संघ व भाजपने आपली राजकीय भूमी तयार केली, असे हरिपाद सांगतात.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0