पेट्रोल व डिझेलच्या अबकारी करात ५ व १० रु.ची कपात

पेट्रोल व डिझेलच्या अबकारी करात ५ व १० रु.ची कपात

नवी दिल्लीः दिवाळीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने बुधवारी पेट्रोल व डिझेलच्या अबकारी करात अनुक्रमे ५ व १० रु.ची कपात केली आहे. गेले काही दिवस पेट्रो

नवज्योत सिद्धू यांना एक वर्षाचा तुरुंगवास
इ-गवर्नन्सबद्दल खासदार उदासीन
काँग्रेसला पुन्हा उभे राहण्यासाठीची संधी

नवी दिल्लीः दिवाळीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने बुधवारी पेट्रोल व डिझेलच्या अबकारी करात अनुक्रमे ५ व १० रु.ची कपात केली आहे. गेले काही दिवस पेट्रोल व डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याने महागाई वाढली होती. त्याने जनमतात सरकारविरोधात असंतोष निर्माण झाला होता. काँग्रेसने तर इंधन दरवाढीचा मुद्दा सतत लावून धरल्याने सरकारची पंचाईत झाली होती. त्यात भाजपच्या केंद्रीय व राज्य पातळीवरच्या नेत्यांनी, मंत्र्यांनी इंधन दरवाढीचे समर्थन करणारी वक्तव्ये केल्याने जनतेत तीव्र नाराजी उमटली होती. सत्तेवर येताना भाजपने इंधन दरवाढीचा मुद्दा आपल्या अजेंड्यात कायम ठेवला होता. आता ७ वर्षे सत्तेत असूनही इंधनाच्या दराने शंभरी पार केल्याने सरकारवर विरोधकांची टीका अधिक टोकदार होऊ लागली. दरवाढीबद्दल सरकारला काहीच पावले उचलता न आल्याने हे मोदी सरकारचे अपयश असल्याचे साफ दिसत होते. ही टीका लक्षात घेता सरकारला अबकारी करात कपात करण्याशिवाय गत्यंतर नव्हते. त्या अनुषंगाने बुधवारी रात्री उशीरा हा निर्णय घेण्यात आला.

सरकारने इंधन दरवाढीबद्दल स्पष्टीकरण देताना डिझेलच्या अबकारी करात पेट्रोलच्या तुलनेत दुप्पट कपात केल्याने त्याचा फायदा शेतकरी वर्गाला होईल असा दावा केला आहे. कोरोनामुळे लागलेले लॉकडाऊन, अर्थव्यवस्थेची खालावलेली स्थिती यामुळे सरकारच्या उत्पन्नात कपात आली होती. आता इंधन अबकारी कपात केल्याचा फायदा रब्बी शेती उत्पादनाला होईल, असे सरकारने म्हटले आहे. त्याचबरोबर पेट्रोल व डिझेलवरील अबकारी कपातीमुळे महागाईला आळा बसेल, क्रयशक्ती वाढेल, मध्यमवर्ग व गरीबांना त्याचा फायदा होईल, अर्थव्यवस्थेला गती मिळेल असे सरकारचे म्हणणे आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: