दिवाळी आली; पण वस्तूंना कमी मागणी

दिवाळी आली; पण वस्तूंना कमी मागणी

दिवाळीला साधारण दोन आठवडे शिल्लक आहे या काळात इलेक्ट्रिकल वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या बड्या कंपन्यांना बाजारपेठेतून मुबलक मागणीही आलेली दिसत नाही. बाजारपेठेत एकूणच मंदीसदृश्य वातावरण असून मागणी कमी झाल्याने मोठी उलाढाल या दिवाळीत होईल याची खात्री नाही असे बहुतांश कंपन्यांच्या सेल्स अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून, बाजारपेठ विश्लेषकाकडून ऐकावयास मिळते.

लॉकडाऊनमुळे देशाची अर्थव्यवस्था संकटातः राजपक्षे
व्हिलेज डायरी भाग नऊ : आणि कैफीयती
लंका आणि लंकेश्वर

नवी दिल्ली/मुंबई : दिवाळी तोंडावर आली असताना सध्या बाजारपेठेत एखादी फेरी मारल्यास फारसे उत्साहाचे वातावरण दिसत नाही. रेफ्रिजरेटर, टीव्ही, वॉशिंग मशीन या इलेक्ट्रॉकल वस्तूंना व टिकाऊ वस्तूंना नेहमीच मागणी असते. ओणम व दिवाळी दरम्यानच्या काळात तर अशा वस्तू खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असतो पण यावेळी देशातील महानगरातील चित्र पाहता ग्राहकांनी इलेक्ट्रिकल वस्तू खरेदी करण्यास फारसा उत्साह दाखवलेला दिसत नाही.

दिवाळीला साधारण दोन आठवडे शिल्लक आहे या काळात इलेक्ट्रिकल वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या बड्या कंपन्यांना बाजारपेठेतून मुबलक मागणीही आलेली दिसत नाही. बाजारपेठेत एकूणच मंदीसदृश्य वातावरण असून मागणी कमी झाल्याने मोठी उलाढाल या दिवाळीत होईल याची खात्री नाही असे बहुतांश कंपन्यांच्या सेल्स अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून, बाजारपेठ विश्लेषकाकडून ऐकावयास मिळते.

‘गोदरेज अँड बॉईस’चे उपप्रमुख व ‘कन्झ्यमुमर इलेक्ट्रॉनिक्स अँड अपलायन्सेस मॅन्युफॅक्चरर्स असो.’(सीईएएमए-सीमा)चे अध्यक्ष कमल नंदी यांच्या मते एनसीआर, मुंबई, बंगळुरू या सारख्या महानगरात टिकाऊ व इलेक्ट्रिकल वस्तूंची मागणी जशी वाढण्याची अपेक्षा होती  तशी ती वाढलेली दिसत नाही. त्याचबरोबर टू टायर किंवा थ्री टायर शहरे, नगरांमध्येही मागणी वाढलेली दिसत नाही.

हेअर अप्लायन्सेस इंडियाचे अध्यक्ष एरिक ब्रेगेंझा सांगतात, बाजारपेठेतून मागणीच गायब आहे. त्याचे कारण अर्थव्यवस्था मंदीत आहे. ग्राहक आपली खरेदी लांबवत आहे. अनेकांना अर्थव्यवस्था सुरळीत झाल्यावर आपण वस्तूंची खरेदी करू शकू असे वाटत आहे.

उद्योग क्षेत्रातील घडामोडींचे विश्लेषक व्ही. व्ही. वर्मा यांचेही मत अशाच स्वरुपाचे आहे. बाजारात मालाला उठाव नसल्याने व किती वस्तू विक्रीला जातील, याचा अंदाज येत नसल्याने उत्पादकाकडून माल खरेदी न करण्याकडे दुकानदारांचा कल आहे. भविष्यात या मंदीची फटका रिटेलर ते ग्राहक या साखळीलाही बसू शकतो. कदाचित सणासुदीच्या काळातही तो दिसून येऊ शकतो, असे ते म्हणतात.

एकूणात बाजारपेठेत ग्राहकची खरेदी क्षमता कमी झाल्याने त्याचा परिणाम वस्तूंच्या विक्रीवर झालेला दिसत आहेच. पण मोठ्या लोकसंख्येची शहरे व लहान शहरे यांच्यातीलही फरक हा रिटेलर्सच्या क्षमतेवरही अवलंबून असलेला दिसतो. ग्राहकांना खरेदीसाठी खेचून आणण्यात रिटेलर्सचे प्रयत्नही महत्त्वाचे ठरू लागलेले आहेत.

‘क्रोमा’सारख्या रिटेलर्सचा धंदा हा चांगला चाललेला आहे पण अन्य रिटेलर्सबाबत फारशी चांगली परिस्थिती नाही. ग्राहकांना आपल्याकडे खेचून आणण्याची क्षमता मोठ्या रिटेलर्स कंपन्यांकडे असते. या कंपन्या अनेक स्कीम, ऑफर्स ग्राहकांपुढे ठेवतात. त्यामुळे विक्री वाढलेली दिसते. पण छोट्या रिटेलर्सकडे एवढी क्षमता नसते, ते ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या योजन्या, सवलती आणू शकत नाहीत, असे नंदी यांचे निरीक्षण आहे.

देशाभरात सुमारे १४० हून अधिक क्रोमाची दुकान साखळी आहे आणि दरवर्षी त्यांची उलाढाल २० टक्क्याने वाढत आहे. या साखळीकडून १५ हजार रु.व त्यावरील जेवढ्या वस्तू विक्रीस आहेत त्यापैकी अर्ध्या वस्तू फायनान्स कंपन्यांमार्फत ग्राहकांनी खरेदी केल्या आहेत.

पण बाजारातल्या एकूण उलाढालीवर उषा इंटरनॅशनलचे संदीप तिवारी यांचे वेगळे म्हणणे आहे, ते म्हणतात, ग्राहक सणासुदीलाच खरेदी करतो असे वातावरण राहिलेले नाही. आता ग्राहक इलेक्ट्रॉनिकल, टिकाऊ वस्तू वर्षाच्या १२ महिन्यात केव्हाही खरेदी करत असतात. एखाद्या सीझनमध्ये वस्तूंची विक्री घटते. ही घट तात्पुरती असते. आता काही दिवसांनी बाजारपेठेत चांगली विक्री होईल.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0