घरगुती सिलेंडरचा दर हजार रुपयाच्या वर

घरगुती सिलेंडरचा दर हजार रुपयाच्या वर

नवी दिल्लीः केंद्र सरकारने घरगुती सिलेंडरच्या दरात गुरुवारी अचानक ३.५० रु.ची वाढ करून सामान्य माणसाला धक्का दिला. याच महिन्यात प्रती सिलेंडर ५० रु.ची

घरगुती सिलेंडरच्या दरात १५ रु.नी वाढ
४ दिवसांत पुन्हा २५ रु.ची गॅस दरवाढ
गॅस सिलेंडरच्या दरात २५ रु.ची वाढ

नवी दिल्लीः केंद्र सरकारने घरगुती सिलेंडरच्या दरात गुरुवारी अचानक ३.५० रु.ची वाढ करून सामान्य माणसाला धक्का दिला. याच महिन्यात प्रती सिलेंडर ५० रु.ची दरवाढ केली होती, त्यानंतर महिन्याभरात ही दुसरी दरवाढ आहे. तर गेल्या दोन महिन्यातील ही तिसरी दरवाढ आहे. गेल्या २२ मार्चला दरवाढ करण्यात आली होती. साडेतीन रुपयाच्या दरवाढीमुळे आता देशात घरगुती गॅस सिलेंडर एक हजार रु.च्या वर गेला असून वाढत्या महागाईत सामान्यांना पुन्हा झळ बसली आहे.

दिल्ली व मुंबईत आता विना सबसिडीचा १४.२ किलोग्रॅमचा गॅस सिलेंडर सुमारे १००३ रु.ला मिळेल. तर व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात ८ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

तेलकंपन्यांनी विनाअनुदानित गॅस सिलेंडरची अधिकवेळा दरवाढ केली असली तरी देशातील आता बहुतांश शहरांमध्ये केंद्र सरकारकडून गॅस सिलेंडरवरची सबसिडी ग्राहकांना दिली जात नाही.त्यामुळे बहुसंख्य ग्राहकांना विना अनुदानित गॅस सिलेंडरचा खरेजी करावा लागतो.

मुंबईत आता नव्या दरवाढीनुसार गॅस सिलेंडर १००२.५० रु. तर चेन्नईमध्ये १.०१८.५० रु. आणि कोलकातामध्ये १०२९ रुपये इतका झाला आहे.

१९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत २,३५४ रुपये इतकी झाली आहे.

सरकारने युक्रेन व रशिया संघर्षाचे कारण देत यापूर्वी गॅस व पेट्रोल-डिझेल दरवाढ केली आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0