पराभव झाला म्हणून भारतीय संघात बदल करू नका…..

पराभव झाला म्हणून भारतीय संघात बदल करू नका…..

भारताचा पहिल्या कसोटीत झालेल्या पराभवाची कारणमीमांसा सर्वदूर होते आहे. सामन्यात विजय झाला की शंभर चुकांकडे दुर्लक्ष केल्या जाते. पराभव झाल्यास प्रत्ये

टॅटूवाला विराट
जनमताची भाषा (लेखमालेतील भाग १)
जामीनावरील प्रज्ञा ठाकूरांच्या हातात क्रिकेटची बॅट

भारताचा पहिल्या कसोटीत झालेल्या पराभवाची कारणमीमांसा सर्वदूर होते आहे. सामन्यात विजय झाला की शंभर चुकांकडे दुर्लक्ष केल्या जाते. पराभव झाल्यास प्रत्येकजण काही ना काही त्रुटी सांगितल्याशिवाय राहत नाही. जिंकण्याचा आनंद मिळवायचा असेल तर प्रत्येक खेळाडूनी संघाला अपेक्षेपेक्षा जास्त देणे जरुरी असते. दुसऱ्यांना चुका दाखविण्याची संधी देण्यापेक्षा स्वतःच त्या वेळीच दुरुस्त करणे आवश्यक असते. पहिल्या कसोटीतील पराभवाचे विश्लेषण जाणकारांबरोबर प्रत्येक खेळाडू, टीमचे कोच आणि टीम मॅनेजमेंटने करणे जास्त संयुक्तिक होईल. ऑस्ट्रेलियातील विजयी मालिकेनंतर लगेच एवढा मोठा पराभव पचविणे खरंच टीम इंडिया सोबत क्रिकेट रसिकांना जडच जाते आहे.

जिंकलेली टीम शक्यतो बदल करत नाही. एखादा दुखापतग्रस्त खेळाडू असेल तर त्याला बदलणे गरजेचे म्हणून बदल होऊ शकतो. विनिंग कॉम्बिनेशन बदलण्याचे धारिष्ट्य सहसा कुठलेही संघव्यवस्थापन करू इच्छित नाही. त्यामुळे इंग्लंडची टीम तीच राहील.

भारतीय टीम मधे कांही बदल आवश्यक वाटतात. पण ते बदल पराभव झाला म्हणून करू नयेत. भविष्यावर नजर ठेवूनच करावे. कुठल्याही खेळाडूच्या एका सामन्यातील कामगिरीवर अविश्वास दर्शवित त्याला टीम मधून बाजूला करणे योग्य होणार नाही. तूर्तास शाबाज नदीम ऐवजी कुलदीपला घ्या असे मत क्रिकेट जाणकार प्रकट करत आहेत. पहिल्या कसोटीत आश्विन आणि सुंदरला घेतल्या गेले. दोघेही चेंडूला उंची देत नाही. फलंदाजाला ऑफ द पीच किंवा फिरकीने बाद करण्याचा प्रयत्न करतात. टीम जवळ कुलदीप यादव आहे जो फिरकी सोबत फलंदाजाला हवेत चकवू शकतो, चेंडूला उंची देऊ शकतो आणि डावखोरा सुद्धा आहे. त्यामुळे भारताच्या फिरकी आक्रमणात विविधता येऊ शकते. खरंतर केवळ एका सामन्यात नदीमला संधी देऊन त्याला काढून टाकणं म्हणजे त्यावर अन्यायच होईल. सुंदरने पहिल्या डावात अप्रतिम फलंदाजी केली. टीममधे सहा फलंदाज असताना आश्विन आणि सुंदरकडून प्रत्येकवेळी फलंदाजीची अपेक्षा करणे योग्य नाही. ज्याप्रमाणे एखादा फलंदाज लवकर बाद होऊ शकतो त्याचप्रमाणे एखाद्या डावात गोलंदाजाला बळी मिळतीलच असे जरुरी नाही. बरेचदा क्षेत्ररक्षकाने त्याच्या गोलंदाजीवर झेल पण सोडलेले असू शकतात. दुसऱ्या डावात तर सूंदरने केवळ एकच षटक टाकलं. टीम व्यवस्थापनाने सूंदरला टीममधे जरूर ठेवावे.

टीममधे यष्टीरक्षक केवळ यष्टीरक्षणाच्या क्षमतेवर असावयास हवा. त्याची फलंदाजी करण्याची क्षमता हा फायदा समजणे योग्य. केवळ चांगली फलंदाजी करू शकतो आणि थोडेफार यष्टीरक्षण सुद्धा करू शकतो म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळविणे जास्त काळ फलदायी होणार नाही. केवळ यष्टीरक्षणाच्या क्षमतेवर त्याची निवड करणे आवश्यक. ऋषभ पंत गेल्या कांही डावात चांगली फलंदाजी करतो आहे. पण त्याची यष्टिरक्षक म्हणून कामगिरी आंतरराष्ट्रीय स्तराची होते आहे काय? सध्या के.एल.राहुल सारखा खेळाडू बाहेर बसला आहे. राहुल कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. त्याला बराच काळ टीममधे न घेणे योग्य राहणार नाही. शिवाय तो यष्टीरक्षण सुद्धा करू शकतो. पंतच्या कामगिरीमुळे तो स्वतः फलंदाज म्हणून सुद्धा निवडल्या जाऊ शकतो. राहुल यष्टिरक्षक फलंदाज म्हणून टीममधे घेणे सुद्धा एक पर्याय होऊ शकतो. पंत तरुण आहे, त्याला योग्यवेळी संधीसुद्धा मिळाली आहे. सुमार क्षेत्ररक्षणाने त्याने ती गमावू नये. ईशांत आणि बुमराह दोघेही आपल्या कामगिरीमुळे टीममधे राहतील हे निश्चित. भारताची बेंच स्ट्रेंग्थ चांगली असल्याने सिराज, नटराजन चांगल्या लयीत असून देखील टीममधे संधी मिळू न शकणे हे खरेच दुर्दैव. भूतकाळात सुद्धा अशा चांगल्या खेळाडूंना संधी मिळण्यास एकतर उशीर झाला किंवा त्यांना संधीच मिळाली नाही.

रोहित आणि रहाणेचे अपयश भारतीय संघाकरीता बोचरे आहे. ते बाद होण्याची पद्धत काळजीपूर्वक बघितली तर त्यांच्या फलंदाजीतील त्रुटी इंग्लिश गोलंदाजांची नीट हेरलेल्या दिसतात. आर्चर, अँडरसन जोडगोळी भारतीयांची डोकेदुखी ठरणार हे निश्चित. न खेळता येणारे चेंडू टाकण्यात ह्या जोडगोळीची महारत आहे. त्या दोघांचा अनुभव आणि आक्रमकता वाखाणणीय आहे. कर्णधार रूट त्यांचा वापर आवश्यक तेवढाच करतो, ही बाब लक्षणीय आहे.

दुसरी कसोटी चेन्नईत होणार आहे. दुसरी खेळपट्टी जरी वापरली तरी ती फिरकी गोलंदाजीला नक्कीच साथ देईल असा चेपाकचा इतिहास आहे. नाणेफेक परत एकदा महत्त्वाची ठरणार हे निश्चित. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या टीमला मोठी धावसंख्या काढणे गरजेचे ठरेल. भारतीय फलंदाजांना खेळपट्टीवर बराच काळ टिकून राहणे अत्यंत आवश्यक ठरेल. गिल आणि पंत कमी वेळात जास्त धावा काढू शकतात. पण कसोटी क्रिकेटमध्ये संयम ही यशाची गुरुकिल्ली ठरते. पहिल्या कसोटीतील अनुभव लक्षात घेता भारतीय गोलंदाजांनी इंग्लिश फलंदाजीवर हावी व्हायला हवे आणि क्षेत्ररक्षकांनी त्यांना योग्य ती साथ द्यायला हवी.

वरील सर्व बाबींचा विचार केल्यास दुसऱ्या कसोटी संघाची निवड खालील बारा खेळाडू मधून व्हावी असे वाटते.

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), के.एल.राहूल, रविचंद्रन आश्विन, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, कुलदीप यादव.

निवड समिती, कर्णधार योग्य टीम निवडतीलच. पण अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका पराभवाने न डगमगता भारताने विजयी परंपरा टिकवून ठेवावी. इंग्लंडचा आणखी एक विजय म्हणजे जागतिक कसोटी स्पर्धेत भारताची माघार ठरू शकते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: