२२ तासानंतर दिल्लीची मतदान टक्केवारी (६२.५९ टक्के) जाहीर

२२ तासानंतर दिल्लीची मतदान टक्केवारी (६२.५९ टक्के) जाहीर

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेसाठी ६२.५९ टक्के मतदान झाल्याची माहिती २२ तासानंतर रविवारी संध्याकाळी निवडणूक आयोगाने दिली. शनिवारी दिल्ली विधानसभेच्या ७०

दंगलप्रकरणी ‘आप’च्या ताहीर हुसेन यांच्यावर गुन्हा दाखल
सिसोदियांच्या घरावर सीबीआयचे छापे
दिल्लीत केजरीवाल यांची हॅटट्रिक ; जनमत चाचण्यांचा निष्कर्ष

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेसाठी ६२.५९ टक्के मतदान झाल्याची माहिती २२ तासानंतर रविवारी संध्याकाळी निवडणूक आयोगाने दिली. शनिवारी दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी मतदान झाले पण निवडणूक आयोगाने मतदान पार पडूनही टक्केवारी जाहीर केली नव्हती. त्यावर आम आदमी पार्टीचे अध्यक्ष व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक आयोग मतदानाची टक्केवारी का जाहीर करत नाही, असा सवाल केला होता. रविवारी केजरीवाल यांनी दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन यांच्या एका ट्विटला रिट्विटही करून २२ तास झाले तरी आयोगाकडून मतदानाची का टक्केवारी जाहीर केली जात नाही, असा प्रश्न उपस्थित केला होता. सत्येंद्र जैन यांनीही देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच मतदान होऊन २२ तास उलटूनही निवडणूक आयोगाकडून मतदानाची टक्केवारी जाहीर केली जात नाही असे विधान केले होते.

अखेर रविवारी संध्याकाळी निवडणूक आयोगाचे अधिकारी रणबीर सिंग, संदीप सक्सेना यांनी दिल्लीत ६२.५९ टक्के मतदान झाल्याचे सांगितले. मतदानाची टक्केवारी अचूक यावी व रिटर्निंग ऑफिसर अन्य कामात व्यस्त असल्याने टक्केवारी जाहीर करण्यास विलंब झाला अशी सारवासारव त्यांनी केली. एकूण झालेल्या मतदानात पुरुषांची टक्केवारी ६२.५५ तर महिलांची टक्केवारी ६२.६२ टक्के इतकी दिसून आली.

लोकसभेपेक्षा २ टक्के कमी मतदान

नुकत्याच झालेल्या लोकसभेत दिल्लीतल्या सात लोकसभा मतदारसंघाची मतदान टक्केवारी ६०.५ टक्के होती. त्या तुलनेत यंदाच्या विधानसभा निवडणुकांत केवळ २ टक्क्यांची मतदान वाढ दिसून आली. शिवाय २०१५च्या विधानसभा निवडणुकांच्या तुलनेत (६७.१२ टक्के) ५ टक्क्याने मतदान घसरल्याचेही दिसून आले.  

दिल्लीत केजरीवाल यांची हॅटट्रिक ; जनमत चाचण्यांचा निष्कर्ष

दिल्लीत केजरीवाल यांची आम आदमी पार्टी तिसऱ्यांदा सत्ता राखेल असा निष्कर्ष सर्वच जनमत चाचण्यांनी जाहीर केला आहे.

एनडीटीव्हीच्या पोल ऑफ एक्झिट पोलने आपला ५२ जागा, भाजपला १७ जागा व काँग्रेसला १ जागा दिली आहे. तर टाइम्स नाऊने आपला ४४, भाजपला २६ जागा दिल्या आहेत. टीव्ही-९ भारतवर्ष-सिसेरोने आपला ५४ व भाजपला १५ जागा तर सुदर्शन न्यूजने आपला ४०-४५ व भाजपला २४-२८ जागा दिल्या आहेत.

रिपब्लिक टीव्हीने आपला ४८-६१ तर भाजपला ९-२१ जागा मिळेल असा अंदाज वर्तवला आहे.

२०१५साली झालेल्या विधानसभा निवडणुकांत केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने ७० पैकी ६७ जागा जिंकून इतिहास रचला होता. हा इतिहास सध्याचे जनमत चाचण्यांचे निष्कर्ष पाहता पुन्हा रचला जाणार नाही असे वाटते. पण केजरीवाल यांना अँटी इन्कम्बन्सीचा फटका बसणार नाही असेही या जनमत चाचण्यांवरून स्पष्टपणे दिसते.

अण्णा हजारे व केजरीवाल यांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून आम आदमी पार्टीचा जन्म झाला होता. या पक्षाने २०१३मध्ये पहिल्यांदा दिल्ली विधानसभा निवडणुका लढवल्या होत्या. त्यावेळी या पक्षाला २८ जागा मिळाल्या होत्या. त्यांनी काँग्रेसच्या ८ आमदारांच्या विनाशर्त पाठिंब्यावर सरकार स्थापन केले होते पण हे सरकार फार काळ चालले नाही. त्यानंतर २०१५मध्ये पुन्हा निवडणुका होऊन केजरीवाल यांनी दणदणीत बहुमत मिळवले होते. २०१३च्या निवडणुकांत भाजपला ३२ जागा मिळाल्या होत्या पण त्यांना सरकार स्थापन करता आले नव्हते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: