गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाच्या व्यापार तुटीत दुपटीने वाढ

गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाच्या व्यापार तुटीत दुपटीने वाढ

नवी दिल्लीः गेल्या ऑगस्ट महिन्यात व्यापार तूट २७.९८ अब्ज डॉलर इतकी झाली असून गेल्या वर्षाच्या तुलनेत ती दुपटीहून अधिक असल्याचे केंद्रीय वाणिज्य मंत्रा

महाराष्ट्रात लसीकरण अडचणीत
डॉ. कफील खान यांच्या चौकशीचे पुन्हा आदेश
एलआयसी विक्रीचा कर्मचारी संघटनांकडून विरोध

नवी दिल्लीः गेल्या ऑगस्ट महिन्यात व्यापार तूट २७.९८ अब्ज डॉलर इतकी झाली असून गेल्या वर्षाच्या तुलनेत ती दुपटीहून अधिक असल्याचे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीतून दिसून येते.

पण ऑगस्ट महिन्यात निर्यात दरात १.६२ टक्के वाढ झाली असून एकूण निर्यात ३३.९२ अब्ज डॉलर इतकी झाली आहे तर आयात दरात ३७.२८ टक्के वाढ झाली असून एकूण आयात ६१.९ अब्ज डॉलर इतकी झाली आहे.

गेल्या वर्षी व्यापार तुटीचा आकडा ११.७१ अब्ज डॉलर होता.

एप्रिल ते ऑगस्ट २०२२-२३ या वर्षांत निर्यातीत १७.६८ टक्के वाढ होऊन ती १९३.५१ अब्ज डॉलर इतकी झाली आहे. तर याच काळात आयात ४५.७४ टक्क्याने वाढून ती ३१८ अब्ज डॉलर इतकी झाली आहे.

या आर्थिक वर्षांतल्या एप्रिल ते ऑगस्ट या ५ महिन्यात व्यापार तूट १२४.५२ अब्ज डॉलर झाली असून गेल्या वर्षी या महिन्यांच्या दरम्यान ती ५३.७८ अब्ज डॉलर इतकी झाली होती.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0