बकरी ईदः गुजरात उच्च न्यायालयाकडून पशुहत्येस बंदी

बकरी ईदः गुजरात उच्च न्यायालयाकडून पशुहत्येस बंदी

नवी दिल्लीः गुजरात उच्च न्यायालयाने राज्यात सार्वजनिक स्थळं, मोहल्ले वा गल्लीत १ ऑगस्टच्या बकरी ईदच्या निमित्ताने जनावरांचे बळी देण्यावर बंदी घातली आह

जशी ‘निःपक्ष’ देशी पत्रकारिता, तसे ‘निष्पक्षपाती’ फेसबुक
एसटीची वाटचाल खासगीकरणाकडे
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ ते २५ ऑगस्ट दरम्यान

नवी दिल्लीः गुजरात उच्च न्यायालयाने राज्यात सार्वजनिक स्थळं, मोहल्ले वा गल्लीत १ ऑगस्टच्या बकरी ईदच्या निमित्ताने जनावरांचे बळी देण्यावर बंदी घातली आहे. हा निर्णय अहमदाबाद शहरापुरता मर्यादित होता. तो आता संपूर्ण राज्यभर लागू करण्यात आला आहे.

राजकोटमधील रहिवाशी यश शाह यांनी गुजरात उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करून बकरी ईदच्या दिवशी ३१ जुलै व १ ऑगस्ट २०२० रोजी राज्यात सार्वजनिकरित्या बकरी, शेळी, मेंढी, म्हैस अशा पशुहत्या करण्यास न्यायालयाने बंदी घालावी अशी मागणी केली होती.

हे मांस पशु चिकित्सा अधिकार्यांनी प्रमाणित केलेले नसल्याने अशा सणाच्या दिवशी सार्वजनिकरित्या केलेल्या पशुहत्यांवर बंदी घालावी. सध्याच्या कोरोनाच्या महासाथीत तर अशा पशुहत्यांवर बंदी असावी व बकरी ईदच्या दिवशी रस्ते, फूटपाथ व सार्वजनिक ठिकाणी पशुहत्या केल्याने त्याने गंभीर आजार पसरतात असे मुद्दे शाह यांनी याचिकेत समाविष्ट केले होते.

या याचिकेला राज्याच्या अडव्होकेट जनरल कमल त्रिवेदी यांनी विरोध करत २५ जुलैला अहमदाबाद पोलिस कमिशनरनी याचिकाकर्त्यांच्या सर्व मुद्द्यांचे निराकरण केल्याचा युक्तिवाद केला. पण मुख्य न्यायाधीश विक्रम नाथ व न्या. जेबी पर्दीवाला यांनी यावर अधिक मत प्रदर्शित न करता राज्यात सर्व ठिकाणी पशुहत्यांची बंदी करावी व तसे आदेश जिल्हा प्रशासनांना द्यावेत असे स्पष्ट केले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0