४ राज्ये व पुड्डूचेरी विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर

४ राज्ये व पुड्डूचेरी विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर

नवी दिल्लीः तामिळनाडू, आसाम, केरळ, प. बंगाल ही ४ राज्ये व पुड्डूचेरी या केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकांची घोषणा शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आ

‘अर्जुनाच्या बाणात अण्वस्त्रे, तर रामायणात पुष्पक विमान’
‘यिन्तु शांग पाओ’ अखेर बंद पडले !
गृहखात्यानेच अमित शहा यांचा ‘बॉम्ब’चा दावा फेटाळला

नवी दिल्लीः तामिळनाडू, आसाम, केरळ, प. बंगाल ही ४ राज्ये व पुड्डूचेरी या केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकांची घोषणा शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने केली. या राज्यांपैकी आसाम व प. बंगालमध्ये मतदान अनुक्रमे तीन व आठ टप्प्यांत होणार असून तामिळनाडू, केरळ व पुड्डूचेरी येथे एकाच दिवशी म्हणजे ६ एप्रिलला मतदान होणार आहे. प. बंगालमध्ये ८ टप्प्यात २७ मार्च, १ एप्रिल, ६ एप्रिल, १० एप्रिल, १७ एप्रिल, २२ एप्रिल, २६ एप्रिल व २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर आसाममध्ये २७ मार्च, १ एप्रिल, ६ एप्रिल असे तीन टप्प्यांत मतदान होणार आहे.

या सर्व राज्यांचा व केंद्रशासित प्रदेशातील निवडणुकांचा निकाल २ मे रोजी जाहीर केला जाणार आहे.

हे मतदान तामिळनाडूतील २३४ विधानसभा जागा, आसाममधील १२६ जागा, केरळसाठी १४० जागा, प. बंगालमधील २९४ जागा व पुड्डूचेरीसाठी ३० जागांसाठी होणार आहेत. एकूण १८ कोटी ६८ लाख मतदार असून ते २ लाख ७० हजार मतदान केंद्रांवर आपले मत नोंदवतील, असे निवडणूक आयोगाने सांगितले.

शुक्रवारी तारखा घोषित झाल्याने ४ राज्ये व १ केंद्रशासित प्रदेशामध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

आसाम, तामिळनाडू, केरळ व प. बंगाल येथील विधानसभांची मुदत येत्या मे व जूनअखेर संपत आहे. आसाममध्ये भाजपची सत्ता असून तामिळनाडूमध्ये अण्णाद्रमुक व केरळमध्ये डावे व प. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची सत्ता आहे. पुड्डूचेरीमध्ये राष्ट्रपती राजवट आहे. काही दिवसांपूर्वी तेथे काँग्रेसचे सरकार बहुमत सिद्ध करू शकले नाही.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0