केवळ जानेवारीत १,२१३ कोटी रु. इलेक्शन बाँडची विक्री

केवळ जानेवारीत १,२१३ कोटी रु. इलेक्शन बाँडची विक्री

नवी दिल्लीः पंजाब, मणिपूर, गोवा, उत्तराखंड व उ. प्रदेश राज्यात विधानसभा निवडणुका होत असून फक्त गेल्या जानेवारी महिन्यात भारतीय स्टेट बँकेने १,२१३ कोटी

वर्षंभरात २ हजार रु.च्या एकाही नोटेची छपाई नाही
बनावट चलनाचे भूत पाकिस्तानातून पुन्हा अवतीर्ण?
परकीय चलनात २ वर्षांतील सर्वात मोठी घट

नवी दिल्लीः पंजाब, मणिपूर, गोवा, उत्तराखंड व उ. प्रदेश राज्यात विधानसभा निवडणुका होत असून फक्त गेल्या जानेवारी महिन्यात भारतीय स्टेट बँकेने १,२१३ कोटी रु.च्या इलेक्शन बाँडची विक्री केली आहे. यातील इलेक्शन बाँडची सर्वाधिक विक्री नवी दिल्लीतल्या एसबीआयच्या शाखेतून ७८४.८४ कोटी रु.ची झाली आहे. तर मुंबईतून एसबीआयच्या शाखेतून ४८९.६ कोटी रु.चे इलेक्शन बाँड विकले गेले आहेत.

२०१८मध्ये इलेक्शन बाँडच्या विक्रीस परवानगी देण्यात आली होती, त्यानंतर पहिल्यांदाच एखाद्या महिन्यात एवढ्या मोठ्या रकमेच्या इलेक्शन बाँडची विक्री झाली आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात ५ राज्यातल्या विधानसभा निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यात ६९५ कोटी रु. इलेक्शन बाँड विकले गेले होते. त्या पेक्षा जवळपास दुप्पट इलेक्शन बाँडची विक्री यावेळी झाली आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते कन्हैया कुमार यांनी एसबीआयमध्ये इलेक्शन बाँडच्या विक्रीबाबत विचारणा केली होती. त्यातून ही माहिती उघडकीस आली आहे.

नवी दिल्ली, मुंबई व्यतिरिक्त कोलकाता येथून एसीबीआयच्या शाखेतून २२४ कोटी रु. चेन्नई येथून १०० कोटी रु.चे इलेक्शन बाँड विकले गेले आहेत.

ज्या राज्यांत निवडणुका आहेत, त्या राज्यात इलेक्शन बाँडची कमी विक्री असून चंडिगढमधून ५० कोटी रु., लखनौमधून ३.२१ कोटी रु., गोव्यातून ९० लाख रु. किमतीचे इलेक्शन बाँड विकले गेले आहेत.

२०१८मध्ये इलेक्शन बाँड विक्रीची सुरूवात झाली होती. त्यानुसार भारतीय नागरिक व कंपन्या एसबीआयच्या देशभरातील २९ शाखेतून बाँड खरेदी करू शकतात. हे बाँड १ हजार रु., १० हजार रु., १ लाख रुपये, १० लाख रु. आणि १ कोटी रु.चे असतात. हे बाँड कोणी खरेदी केले याची माहिती गोपनीय ठेवली जाते व हा पैसा निवडणुकांसाठी वापरला जातो.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: