६ हजार कोटींच्या इलेक्ट्रोरल बाँडची विक्री

६ हजार कोटींच्या इलेक्ट्रोरल बाँडची विक्री

लोकसभा निवडणुका दरम्यानच्या काळात बाजारात इलेक्ट्रोरल बॉँड आणल्यानंतर १२,३१३ बाँडची विक्री झाली असून त्याची एकूण किंमत ६,१२८.७२ कोटी रु. झाल्याची माहि

युती ही भाजपा – सेनेची मजबुरी
महाराष्ट्राच्या राजकारणात बिनचेहर्‍यांची सद्दी
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ फडणवीस रस्त्यावर

लोकसभा निवडणुका दरम्यानच्या काळात बाजारात इलेक्ट्रोरल बॉँड आणल्यानंतर १२,३१३ बाँडची विक्री झाली असून त्याची एकूण किंमत ६,१२८.७२ कोटी रु. झाल्याची माहिती असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सचे (एडीआर)ने दिली आहे. या एकूण बाँडमधील १२,१७३ बॉंडमधून राजकीय पक्षांना ६१०८.४७ कोटी रु. मिळाले आहेत. लोकसभा निवडणुकांच्या १२ फेऱ्यांमध्ये या बॉँडची विक्री झाली असून १२,३१३ बाँडमधील ६,५२४ बाँडची किंमत प्रत्येकी एक कोटी रु. इतकी होती. तर ४,८७७ बाँडची किंमत प्रत्येकी १० लाख रु. होती, असे एडीआरचे म्हणणे आहे.

एडीआरने माहिती अधिकारातून इलेक्ट्रोरल बाँडचे हे वास्तव पुढे आणले आहे. या इलेक्ट्रोरल बाँडची सर्वाधिक विक्री मुंबईत (२,८९९, विक्री मूल्य १,८७९.९६ कोटी रु.) त्यानंतर कोलकाता (३,४७८, विक्री मूल्य १,४४०.३३७ कोटी रु. व दिल्ली (१,६३० , विक्री मूल्य ९१८.५८ कोटी रु.) येथे झाली आहे.

एडीआरच्या आकडेवारीतून हेही लक्षात येते की, १२ व्या फेरीत सुमारे १२,१७३ बाँडची विक्री होऊन त्यातून ६,१०८.४७ कोटी रु. राजकीय पक्षांनी मिळवले. गेल्या एप्रिल महिन्यात ९ व्या फेरीत २२५१.३२ कोटी रु.चे ४६०७ बाँड विकले गेले तर मार्चमध्ये ८ व्या फेरीत ही विक्री १३६४.६९ कोटी रु. इतकी होती. त्यानंतर मे महिन्यात ८१९.२६ कोटी रु.च्या ११५३ बाँड्सची विक्री झाली.

मूळ बातमी

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0