अॅनिमिया उच्चाटनः गुणसंवर्ध‍ित तांदळाचे वितरण

अॅनिमिया उच्चाटनः गुणसंवर्ध‍ित तांदळाचे वितरण

मुंबई: अॅनिमिया आजाराचे समुळ उच्चाटन करण्यासाठी, केंद्र शासनाकडून २०२२ पर्यंत राज्यासाठी सर्व जिल्ह्यांना गुणसंवर्धित तांदुळ म्हणजेच फोर्टीफाइड राइस व

कोणाच्या खांद्यावर कोणाची बंदूक?
शेतकऱ्यांचा रेल्वे रोकोचा इशारा
प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांचे विद्रोही संचलन?

मुंबई: अॅनिमिया आजाराचे समुळ उच्चाटन करण्यासाठी, केंद्र शासनाकडून २०२२ पर्यंत राज्यासाठी सर्व जिल्ह्यांना गुणसंवर्धित तांदुळ म्हणजेच फोर्टीफाइड राइस वाटप करण्यात येणार आहे. या तांदळाच्या वितरणासाठी प्रशासकीय यंत्रणांनी त्यांच्या स्तरावरील कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी दिले. २६ जानेवारी २०२२ पर्यंत राज्यात ही योजना सुरू होणार आहे. राज्यात सध्या गडचिरोली जिल्ह्यात फोर्टीफाइड राइसचे वितरण सुरू आहे.

केंद्र सरकारने २०२४ पर्यंत देशातील सर्व जिल्ह्यांना १०० टक्के फोर्टीफाइड राइस उपलब्ध करून देण्याबाबतची योजना आखली असून त्यासाठी केंद्राकडून अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. देशातील तामिळनाडू, तेलंगणा, हरियाणा, मध्य प्रदेश या राज्यांनी १०० टक्के गुणसंवर्धित तांदळाचे वितरण चालू केले आहे. केंद्र शासनाकडून फोर्टीफाइड राइस वितरणासाठी महाराष्ट्रामध्ये गडचिरोली जिल्ह्याची प्रायोगिक तत्वावर निवड करण्यात आली असून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर सार्वजनिक वितरण प्रणालीमधून गुणसंवर्धित तांदळाचे (फोर्टीफाइड राइसचे) वितरण सुरू आहे. त्यासाठी केंद्राने निर्देश दिल्याने राज्यात यंत्रणांना भुजबळ यांनी निर्देश दिले आहेत.

देशात आणि राज्यात अॅनेमियाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. अॅनिमिया प्रामुख्याने रोजच्या जेवणात व्हिटामिन ओ, बी-९/फॉलेट व बी-१२ या पोषणद्रव्याच्या कमतरतेमुळे दिसून येतो. जर पुरेशा प्रमाणात जेवणातून लोह व इतर पोषक द्रव्य मिळाल्यास अॅनिमिया मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आणता येतो, असे संशोधनातून सिद्ध झाले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0