महिला हक्क कार्यकर्त्या कमला भसीन यांचे निधन

महिला हक्क कार्यकर्त्या कमला भसीन यांचे निधन

भारत आणि दक्षिण आशियाई क्षेत्रातील स्त्रीवादी चळवळीचा प्रमुख आवाज असलेल्या कमला भसीन यांचे शनिवारी पहाटे निधन झाले. स्त्री-पुरुष समानता, शिक्षण, दारिद्र्य-निर्मूलन, मानवाधिकार आणि दक्षिण आशियातील शांतता यासारख्या मुद्द्यांवर त्या १९७० पासून सक्रिय होत्या.

ममता बॅनर्जी यांचा विजय
प्रकाशमय सणात रुपेरी पडदा अंधारातच
मोदींच्या कार्यालयाची ‘ओएलएक्स’वर जाहिरात

भारत आणि दक्षिण आशियाई क्षेत्रातील स्त्रीवादी चळवळीचा प्रमुख आवाज असलेल्या कमला भसीन यांचे शनिवारी पहाटे निधन झाले. स्त्री-पुरुष समानता, शिक्षण, दारिद्र्य-निर्मूलन, मानवाधिकार आणि दक्षिण आशियातील शांतता यासारख्या मुद्द्यांवर त्या १९७० पासून सक्रिय होत्या.

प्रख्यात महिला हक्क कार्यकर्त्या, कवयित्री आणि लेखिका कमला भसीन यांचे शनिवारी निधन झाले. त्या७५ वर्षांच्या होतया.

सामाजिक कार्यकर्त्या कविता श्रीवास्तव यांनी ट्विटरवर सांगितले की, भसीन यांनी सकाळी ३ च्या सुमारास अखेरचा श्वास घेतला.

कविता श्रीवास्तव यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे, की ‘आमची प्रिय मैत्रीण कमला भसीन यांचे २५  सप्टेंबर रोजी पहाटे ३ च्या सुमारास निधन झाले. भारत आणि दक्षिण आशिया क्षेत्रातील महिलांच्या चळवळीला हा मोठा धक्का आहे. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी जिवंतपणासह जीवनाचा आनंद घेतला. कमला तुम्ही आमच्या हृदयात सदैव जिवंत असाल.’

भसीन १९७० च्या दशकापासून लिंग समानता, शिक्षण, दारिद्र्य-निर्मूलन, मानवाधिकार आणि दक्षिण आशियातील शांतता या विषयांवर सक्रिय होत्या.

जमिनीवर तळागाळात काम करणाऱ्या भसीन स्त्रीवादी तत्त्वांना जोडणाऱ्या दक्षिण आशियाई नेटवर्क ‘संगत’ च्या संस्थापिका म्हणूनही प्रसिद्ध होत्या. ग्रामीण आणि आदिवासी समाजातील वंचित महिलांसाठी काम करण्यासाठी त्यांनी ‘संगत’ची २००२ मध्ये स्थापना केली.

भसीन यांचा जन्म २४ एप्रिल १९४६ रोजी मंडी बहाउद्दीन या सध्याच्या पाकिस्तानात असलेल्या  जिल्ह्यात झाला. त्या स्वतःला ‘मध्यरात्रीची मुलगी’ म्हणवून घेत, ज्याचा संदर्भ फाळणीच्या आसपास जन्मलेल्या उपखंडातील पिढीशी आहे.

त्यांनी राजस्थान विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी मिळवली आणि पश्चिम जर्मनीतील मन्स्टर विद्यापीठातून समाजशास्त्राचा अभ्यास केला.

१९७६ ते २००१ पर्यंत त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेत काम केले. यानंतर त्यांनी स्वतःला पूर्णपणे ‘संगत’ च्या कामांसाठी आणि तळागाळात संघर्षासाठी झोकून दिले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0