लंडनमध्ये लॉकडाऊन, विमान वाहतूक बंद

लंडनमध्ये लॉकडाऊन, विमान वाहतूक बंद

कोविड-१९ विषाणूचा नवा प्रकार दिसल्यानंतर ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी शनिवारी लंडनमध्ये लॉकडाऊनची घोषणा केली. तर आग्नेय इंग्लंडच्या अनेक भागा

‘कणखर पंतप्रधान पुरेसा नाही’
लॉकडाऊनमध्ये ते चालले २९०० किमी
राज्यात रुग्ण संख्या ३ लाखांच्या पुढे

कोविड-१९ विषाणूचा नवा प्रकार दिसल्यानंतर ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी शनिवारी लंडनमध्ये लॉकडाऊनची घोषणा केली. तर आग्नेय इंग्लंडच्या अनेक भागांमध्ये ख्रिसमस मेळाव्यांवर बंदी घालण्यात आली आहे. नागरिकांनी आपल्या घरातल्या कुटुंबियांसमवेत ख्रिसमस साजरा करावा असे सरकारने जाहीर केले आहे. शनिवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची तातडीने बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत इंग्लंडच्या आग्नेय प्रदेशात कोरोना विषाणूचा एक प्रकार फैलावत असल्याचा मुद्दा मांडण्यात आला. हा विषाणू मूळ कोरोना विषाणूच्या तुलनेत ७० टक्के संसर्गजन्य आहे, त्याला रोखण्यासाठी लॉकडाऊन पुकारावा लागत असल्याचे जॉन्सन म्हणाले. कोरोनाने आपल्यावर हल्ला करण्याचे तंत्र बदलले आहे आपण बचावाचे तंत्र बदलले पाहिजे. हा विषाणू वेगाने पसरत असल्याची माहिती मिळाल्याने खबरदारीचे उपाय करावे लागत असल्याचे जॉन्सन म्हणाले.

दरम्यान रविवारी लंडनमध्ये कोविड-१९च्या नवे १३ हजार रुग्ण आढळले आहेत.

कोणत्याही विषाणूबद्दल बदल होत असतात, हे बदल काही देशात आढळत आहेत, लंडनमध्ये ६० टक्के नव्या बाधितांमध्ये कोरोना विषाणूतील बदल आढळल्याची माहिती आरोग्य तज्ज्ञांनी दिल्यानंतर लंडन लॉकडाऊन करावे लागत असल्याचे ब्रिटीश प्रशासनाने सांगितले.

इटाली, बेल्जियम, नेदरलँड्सने उड्डाणे रोखली

लंडन लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर खबरदारीचे उपाय म्हणून नेदरलँड्स, बेल्जियमने आपली लंडनकडे जाणारी सर्व विमान उड्डाणे रोखली आहेत. बेल्जियमने आपली लंडनकडे जाणारी रेल्वेसेवाही तात्पुरती बंद केली आहे. इटालीनेही विमान उड्डाणे रोखली आहेत. फ्रान्स व जर्मनीकडूनही हा निर्णय घेण्याची शक्यता आहे. आयर्लंडनेही आपल्या आरोग्य खात्याला परिस्थितीची माहिती घेऊन सूचना देण्यास सांगितले आहे. ऑस्ट्रियाही ब्रिटनला जाणारी आपली विमान सेवा स्थगित करण्याच्या विचारात असल्याचे वृत्त आहे.

नवा प्रकार काय आहे?

गेल्या ऑक्टोबरमध्ये कोरोना विषाणूचे विश्लेषण करताना त्यामध्ये म्युटेशन होत असल्याचे दिसून आले होते. जागतिक आरोग्य संस्थेलाही नेदरलँड्स, डेन्मार्क व ऑस्ट्रेलियात म्युटेशन आढळून आले. या नव्या विषाणूचा प्रसार पूर्वीच्या विषाणूपेक्षा अधिक वेगवान ७० टक्क्यांपर्यंत आढळून आला आहे व या विषाणूत कोणते जेनेटिक बदल झाले आहेत व त्याचा मानवी शरीरावर कोणते परिणाम होतात याबद्दल माहिती उपलब्ध नाही.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: