उत्तर भारतात उष्म्याची लाट

उत्तर भारतात उष्म्याची लाट

बेंगळुरू: हवामान बदल जगभरातील ऋतूंचे नमुने उद्ध्वस्त करून ठेवत असतानाच, भारताला अधिकाधिक तीव्र उष्णतालाटांचा सामना करावा लागणार आहे. भारतीय हवामानशास्

आगरकोट किल्ला आणि पाणथळीतले पक्षी
आरे कॉलनी आंदोलन सुरूच
जग्गींच्या संस्थेला पर्यावरण नियमांतून सवलत मिळू शकते!

बेंगळुरू: हवामान बदल जगभरातील ऋतूंचे नमुने उद्ध्वस्त करून ठेवत असतानाच, भारताला अधिकाधिक तीव्र उष्णतालाटांचा सामना करावा लागणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अर्थात आयएमडीच्या मते, ज्या दिवसांतील सरासरी कमाल तापमान, दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत ४.५ ते ६.४ अंश सेल्सिअस अधिक तापमानाची मर्यादा ओलांडते, तेव्हा उष्णतेची लाट आली असे म्हटले जाते. (सखल भूभागांत कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसहून अधिक असेल व किनारपट्टीवरील भूभागांत ते ३७ अंश सेल्सिअसहून अधिक असेल, तरी त्याला उष्णतेची लाट म्हटले जाते).

१९८१ ते २०१० या काळात नवी दिल्लीतील मे महिन्यातील सरासरी कमाल तापमान ३९.५ अंश सेल्सिअस आहे. याचा अर्थ शहराचे तापमान जेव्हा ४४ अंश सेल्सिअसचा (सरासरीहून ४.५ अंश अधिक) टप्पा ओलांडेल, तेव्हा उष्णतेची लाट आली असे तांत्रिकदृष्ट्या म्हटले जाईल. आयएमडीने नवी दिल्लीसाठी पूर्वीच ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. याचा अर्थ आपण पाऱ्यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. कारण, २८ एप्रिलपर्यंत शहराचे तापमान ४४ अंश सेल्सिअस होईल असा आयएमडीचा अंदाज आहे.

हे काही निव्वळ आकडे नाहीत. या मूल्यांत दडलेले घटक मानवी जीवशास्त्र, सार्वजनिक आरोग्य आणि हवामानविषयक संकटातील प्रशासन या सर्वांशी थेट जोडलेले आहेत. हे वेट बल्बतापमान आहे. एखादी वस्तू उष्ण वातावरणात ठेवली असता, तिचे किमान तापमान काय असेल हे यात मोजले जाते. या वस्तूच्या पृष्ठभागावरील द्रवाचे बाष्पीभवन होत असल्याने ती एकीकडे थंड होत जाते.

उदाहरण म्हणून आपल्या शरीरावरील त्वचेचा विचार करू. एखाद्या उष्ण दिवशी त्वचेचे किमान तापमान किती खाली उतरू शकते हे वेट-बल्ब तापमानातून दिसून येते. बाहेर उष्णता असते आणि त्वचेवरील घामाचे बाष्पीभवन होत असते.

वेदर-ट्रॅकर मेटीओलॉक्सनुसार, दक्षिण दिल्लीत २६ एप्रिल, २०२२ रोजी सकाळी साडेआठ वाजता १९.५ अंश सेल्सिअस एवढे वेट-बल्ब तापमान होते. हे सुसह्य आहे. काही तास बाहेर काम केले तर वेट-बल्ब तापमान ३२ अंश सेल्सिअस होऊ शकेल आणि ते शरीराला थकवणारे ठरेल. वेट-बल्ब तापमान ३५ अंश सेल्सिअसहून वाढले तर मृत्यूही होऊ शकते. तुम्ही काही तास बाहेर काढले, अमर्याद पाणी प्यायले आणि शारीरिक हालचाल फारशी केली नाही, तर ही शक्यता वाढते.

उष्मा आणि आर्द्रता

तुम्ही मेटिओलॉजिक्सचा नकाशा झूम आउट करून संपूर्ण आशिया बघितलात, तर जसजसे विषुववृत्ताकडे जातो, तसतसे वेट-बल्ब तापमान वाढत जाते हे तुमच्या लक्षात येईल आणि ते भारताच्या पूर्व किनारपट्टीवर पश्चिम किनारपट्टीच्या तुलनेत अधिक असते. याचे कारण म्हणजे हवेतील आर्द्रता किंवा दमटपणा: वातावरण जेवढे अधिक दमट असेल, तेवढे घामाचे बाष्पीभवन कमी होते आणि शरीराचे तापमान कमी होण्याची प्रक्रिया कमी प्रमाणात होते. अगदी कमी वेट-बल्ब तापमानालाही शरीराचे तापमान वाढू शकते. त्यामुळे या भागात केवळ वेट-बल्ब तापमान जाणून घेणे पुरेसे ठरत नाही. आपल्याला हवेतील दमटपणाही तपासावा लागतो.

न्यू यॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठातील संशोधकांनी २०२० साली असे म्हटले होते की, चालू शतकाच्या उत्तरार्धात पृथ्वीवर उष्मा व दमटपणा यांचे प्राणघातक संयोग दिसून येतील हा त्यांच्या मागील अभ्यासांतील अंदाज चुकीचा होता. आता कोलंबिया टीमने असे लिहिले आहे की, पृथ्वीच्या पृष्ठभागावरील अनेक भागांमध्ये अशा प्राणघातक परिस्थिती आत्ताच निर्माण होऊ लागल्या आहेत.

१९७९ ते २०१७ या काळात संग्रहित हवामानाच्या आकडेवारीच्या आधारे त्यांनी ‘भारताची पूर्व किनारपट्टी’ आणि ‘वायव्य भारत’ हे अशा परिस्थितीचे हॉटस्पॉट्स ठरतील असे म्हटले होते. हे प्रदेश वेट-बल्ब तापमानाच्या ९९.९व्या पर्सेंटाइलमध्ये येतात (किमान तापमान ३१ अंश सेल्सिअस).

अधिक ढोबळपणे सांगायचे तर मध्य अमेरिका, उत्तर अमेरिका, आखाती देश, वायव्य व आग्नेय भारत आणि आग्नेय आशिया या भागांत कमाल वेट-बल्ब तापमान ३५ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडून गेल्याचे किमान एकेक उदाहरण तरी आहे.

कोलंबिया विद्यापीठाच्या अभ्यास अहवालाचे लेखक म्हणतात की, त्यांचा अभ्यास वेगळा आहे, कारण, दमटपणामध्ये काही तासांत बदल होऊ शकतो. यामुळे शरीराचा उष्मा बराच काळ वाढलेला राहू शकतो आणि हे प्राणघातक ठरू शकते. ही शक्यता तपासण्यासाठी त्यांनी सर्वेक्षणात समाविष्ट केलेल्या हवामान केंद्रांवरील दर तासाला अद्ययावत होणारा डेटा वापरला.

आरसीपी ४.५ आणि ८.५

जागतिक तापमानवाढीमुळे समुद्राचे स्तर वाढत आहेत. याला उष्णतेच्या लाटांची जोड मिळाल्यास भारतातील अनेक भाग येत्या काही वर्षांत निवासायोग्य उरणार नाहीत. मात्र, कोणते भाग राहण्याजोगे उरणार नाहीत आणि हे केव्हा घडेल ते रिप्रेझेंटेटिव कॉन्सन्ट्रेशन पाथवे अर्थात आरसीपींवर अवलंबून आहे. या शतकभरात मानवी कृतींमधून किती कार्बनवायू उत्सर्जित होतात यावर ते अवलंबून आहे.

आरसीपी ४.५ हा ‘मध्यवर्ती’ पाथवे म्हणून ओळखला जातो, यात जगातील कार्बनवायू उत्सर्जन २०४० मध्ये कळस गाठेल आणि मग घसरू लागेल. आरसीपी ८.५ मध्ये कार्बन उत्सर्जन संपूर्ण २१वे शतकभर वाढतच राहील. यूएन इंटरगव्हर्न्मेंट पॅनल ऑन क्लायमेट चेंज अर्थात आयपीसीसीच्या मते, असे होणार नाही. मात्र, २१व्या शतकाच्या मध्यावरील कार्बन उत्सर्जनाचा अंदाज बांधण्यासाठी तेच संदर्भ म्हणून वापरले जाते. कारण, आत्तापर्यंत उत्सर्जनातील घट फारच क्षुल्लक आहे.

२०२० मधील अभ्यासानुसार, आरसीपी ८.५ स्थितीतील वेट-बल्ब तापमान ‘१०० ते २५० पटींनी’ अधिक असू शकते. यातील उद्भासन (एक्स्पोजर) व्यक्ती-दिवसांमध्ये मोजले जाते.

३५ अंश सेल्सिअस ही वेट-बल्ब मर्यादा मानणार्या २०१० सालच्या अभ्यासात सहा तासांच्या कालखंडाचा तापमान डेटा वापरण्यात आला होता. वेट-बल्ब तापमान ३५ अंश सेल्सिअसहून अधिक सहा तासांसाठी राहिल्यास व्यक्ती आजारी पडू शकते असे यात गृहीत धरले आहे (प्रत्यक्षात हे बरेच लवकर घडू शकते). आरसीपी ४.५ आणि आरसीपी ८.५ यातील फरकावरून असे दिसते की, २०८० सालापर्यंत किमान २५ पट अधिक लोक हवामानामुळे गंभीर आजारी पडू शकतात.

हे अंदाज ढोबळ आहेत पण उत्तर भारतात सध्या केवळ उष्म्याच्या लाटेमुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेपुढे उभे राहिलेले आव्हान किती गंभीर आहे याची कल्पना याद्वारे येऊ शकेल. या उष्म्याच्या लाटेला दुष्काळाची किंवा साथीची किंवा एखाद्या विमान अपघाताची जोड मिळाली तर?

उष्मा कृती योजना

२०२०मधील अभ्यासात ईशान्य भारत आणि पश्चिम आफ्रिकेची किनारपट्टी या प्रदेशांतील तुरळक शीत संरचनेवर तसेच तुलनेने कमी असलेल्या समायोजन क्षमतेवर बोट ठेवण्यात आले होते. दक्षिण आशियातील उष्म्याच्या लाटांबद्दलच्या अभ्यासांमध्ये नक्कीच भारतातील गंगेच्या खोऱ्यातील प्रदेशावर भर देण्यात आला आहे, कारण, हा प्रदेश अतिउष्म्याला बळी पडण्याची शक्यता अधिक आहे आणि या भागात ४०० दशलक्ष लोक राहतात.

या भागांत देशातील अनेक ‘बिमारू’ राज्ये मोडतात. या राज्यांमध्ये सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेकडे पैसा नाही, साधने नाहीत, पुरवठा नाही. २०१३ मध्ये गुजरातमधील अहमदाबाद हे ‘हीट अॅक्शन प्लान’ स्वीकारणारे देशातील पहिले शहर ठरले. तेव्हापासून आत्तापर्यंत ३० ते ४० शहरांनी अशी योजना स्वीकारली आहे. यात जागरूकता मोहिमा, लवकर इशारा देणाऱ्या प्रणाली प्रस्थापित करणे आणि पॅसिव्ह कूलिंग सोल्युशन्सचा समावेश आहे. याद्वारे असुरक्षित भागांतील उष्म्याचा संपर्क कमी करता येऊ शकेल. नागरी उष्मा-बेट प्रभावामुळे शहरांतील उष्म्याच्या लाटा अधिक घातक ठरणार आहेत.

ही पावले आवश्यक आहेत, पण पुरेशी नाहीत. आपण उष्म्याच्या लाटेची व्याख्या नव्याने करून त्यात दमटपणाचा समावेश करणे आवश्यक आहे. कारण, त्यामुळे वेट-बल्ब तापमान वाढते. शिवाय शहरांच्या विस्ताराची पद्धत बदलण्याची गरज आहे.

आत्तापुरते, आयपीसीसीच्या मते, भारतातील वेट-बल्ब तापमान क्वचितच ३० अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडते. (जसा दिल्लीत जुलै २०२१ मध्ये ओलांडला गेला होता.) मात्र, ही स्थिती लवकरच बदलू शकते. आरसीपी ४.५ स्थितीत, आशियातील शहरांना अधिक उष्मा सहन करावा लागू शकतो. आरसीपी ८.५ स्थितीनुसार, भारतात सर्वत्र वेट-बल्ब तापमान ३५ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडू शकते.

मूळ लेख:

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: