दोन दिवसांत मान्सूनच्या आगमनाची शक्यता

दोन दिवसांत मान्सूनच्या आगमनाची शक्यता

नवी दिल्लीः येत्या दोन-तीन दिवसांत केरळच्या किनाऱ्यावर मान्सूनचे आगमन होणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. केरळच्या किनाऱ्यावर मान्स

पर्यावरण संवर्धन निर्देशांक यादीत भारत तळाला
उत्तराखंडात हत्तींच्या वनावर विमानतळाचे अतिक्रमण
केरळमध्ये १ जूनला मान्सूनचे आगमन

नवी दिल्लीः येत्या दोन-तीन दिवसांत केरळच्या किनाऱ्यावर मान्सूनचे आगमन होणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. केरळच्या किनाऱ्यावर मान्सून येण्याची हवामान परिस्थिती पूर्ण झाली आहे, असेही हवामान खात्याचे म्हणणे आहे.

२७ मे रोजी केरळच्या किनारपट्टीवर मान्सून धडकेल असा अंदाज १३ मे रोजी हवामान खात्याने वर्तवला होता. हा मान्सून गेल्या वर्षाच्या तुलनेत ७ दिवस आधी येईल असेही हवामान खात्याचे म्हणणे होते. हा अंदाज खरा ठरेल असे खात्याला वाटते. मान्सूनचे लवकर आगमन झाल्याचा भारतातील सर्वच राज्यांना दिलासाच मिळेल. कारण गेले काही दिवस संपूर्ण भारतात उष्णतेच्या लाटेने हाहाकार माजवला आहे. अंगाची काहिली करणाऱ्या तापमानात मान्सूनचे लवकर होणारे आगमन उतारा ठरेल.

हवामान खात्याचा मान्सूनचा अंदाज चुकल्यास भारत सरकारला शेतीमाल आयातीवर भर द्यावा लागेल. भारताला खाद्य तेलाची आयात वाढवावी लागेल त्याच बरोबर काही शेतीमालांच्या निर्यातीवर बंदी घालावी लागेल. भारताच्या अर्थव्यवस्थेत शेतीचा हिस्सा १५ टक्के असून त्यावर सुमारे १ अब्ज ३० कोटी नागरिकांची गुजराण चालते.

भारतात पडणाऱ्या एकूण पावसातील ७० टक्के पाऊस हा शेती, धरणे यांना साह्य करतो.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0