१८ वर्षांवरील सर्वांना आता कोविड-१९ची लस

१८ वर्षांवरील सर्वांना आता कोविड-१९ची लस

देशातील कोरोनाचा वाढता संसर्ग आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल टाकत सोमवारी केंद्र सरकारने १ मे पासून कोविड-१९ची लस १८ वर्षांवरील सर्वांना देण्याचा निर्णय घेतला आहे. या पूर्वी ४५ वयाची अट होती. ही अट मागे घेताना लसीकरणाचा देशव्यापी तिसरा टप्पा म्हणून १८ वर्षे वयोगटावरील सर्वांचे लसीकरण करण्याचे सरकारने ठरवले आहे. या लसीकरणात दुसर्या टप्प्याच्या लसीकरणाला तसेच ४५ वयापुढील सर्व वयोगटातील नागरिकांना कोरोनाची लस देण्याला प्राधान्यही असणार आहे.

या निर्णयाबरोबर लस उत्पादकांना आता त्यांच्या एकूण उत्पादनाच्या ५० टक्के लसी केंद्राला व उर्वरित ५० टक्के लसी राज्यांना तसेच खुल्या बाजारात विक्रीचीही परवानगी देण्यात आली आहे. राज्य सरकार थेट लस उत्पादकाकडून लसीचे डोस घेतील असेही केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

मूळ बातमी

COMMENTS