कॅगचे माजी महासंचालक विनोद राय यांचा माफीनामा

कॅगचे माजी महासंचालक विनोद राय यांचा माफीनामा

नवी दिल्लीः एका बदनामी खटल्यात देशाचे माजी नियंत्रक व महा लेखापरीक्षक (कॉम्पट्रोलर अँड ऑडिटर जनरल-कॅग) विनोद राय यांनी काँग्रेसचे माजी खासदार संजय निर

केंद्राने जीएसटीबाबत कायद्याचे उल्लंघन केले : कॅग
राफेलः ऑफसेट कराराची पूर्तता नाही
अदानींच्या गोदामाचा खर्च सरकारने उचलला : कॅग

नवी दिल्लीः एका बदनामी खटल्यात देशाचे माजी नियंत्रक व महा लेखापरीक्षक (कॉम्पट्रोलर अँड ऑडिटर जनरल-कॅग) विनोद राय यांनी काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांची माफी मागितली आहे.

देशाला हादरवून टाकणार्या टुजी स्पेक्ट्रम घोटाळ्याच्या कॅगच्या अहवालातून तत्कालिन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे नाव हटवावे यासाठी संजय राऊत यांनी आपल्यावर दबाव आणल्याचे वक्तव्य विनोद राय यांनी २०१४ साली टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत केले होते. या वक्तव्यावरून निरुपम यांनी विनोद राय यांच्यावर दिल्लीतील पतियाला न्यायालयात बदनामीचा खटला दाखल केला होता.

राय यांच्या मुलाखतीमुळे देशभरातील वर्तमानपत्रे व वृत्तवाहिन्यांवर या वक्तव्याची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. यूपीए सरकारवर विरोधक आक्रमक झाले होते.

या खटल्याने अडचणीत आलेल्या विनोद राय यांनी संजय निरुपम यांच्या संदर्भात केलेले वक्तव्य अनाहुतपणे व चुकीने केले होते, त्याची बिनशर्त आपण माफी मागतो असे दिल्लीतील पतियाला न्यायालयाला सांगितले. मुलाखतीत व्यक्त केलेली मते चुकीने झाली होती. त्याचा निरुपम व त्यांच्या कुटुंबियांना मोठा त्रास व वेदना झाल्या. या बद्दल मी त्यांची व कुटुंबियातील सर्वांची बिनशर्त माफी मागत असून त्यांच्या कुटुंबांचे मी शुभ चिंततो असे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले.

त्यानंतर न्यायालयाने राय यांना आरोपातून मुक्त केले.

या माफीवर आपली प्रतिक्रिया देताना निरुपम यांनी राय यांना टोला मारला. राय यांनी आता संपूर्ण देशाची माफी मागावी. त्यांनी सादर केलेल्या बनावट कागदपत्रांमुळे यूपीए सरकारने कोळसा व स्पेक्ट्रम घोटाळा केला असा समज देशभर पसरला, असे निरुपम म्हणाले.

दरम्यान राय यांच्या या माफीनाम्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे राज्यसभा खासदार दिग्विजय सिंग यांनी कोणताही ठोस पुरावा नसताना राय यांनी कोळसा खाणी निविदा व टुजी स्पेक्ट्रम घोटाळ्याचे आरोप यूपीए सरकारवर केले होते. त्यातून सरकारची व काँग्रेसची मोठी बदनामी होऊन त्याचा फायदा भाजपला झाला होता. भाजपने या फायद्याचे बक्षिस निवृत्त झाल्यानंतर विनोद राय यांना दिले, अशी टीका केली.

राय यांनी त्यांच्या द डायरी ऑफ द नेशन्स कॉन्शसन्स कीपर या पुस्तकातून यूपीए सरकार अनेक आरोप केले आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: