टेक फॉग नेमके काय करू शकते?

टेक फॉग नेमके काय करू शकते?

नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाचा नाराज कार्यकर्ता असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीने, ‘टेक फॉग’ नावाचे एक अत्याधुनिक व छुपे अॅप अस्तित्वात असल्याचा आरोप, एप्रिल २०२० मध्ये @Aarthisharma08 या एका निनावी ट्विटर अकाउंटद्वारे केला.

त्यानंतरच्या दोन वर्षांत या व्हिसलब्लोअरशी झालेल्या संपर्काच्या एका दीर्घ प्रक्रियेद्वारे, ‘द वायर’ने, या आरोपाची कसून तपासणी केली. या संपूर्ण शोध वृत्तांत तुम्ही येथे वाचू शकता.

या स्रोताने पाठवलेल्या टेक फॉगच्या स्क्रीनकास्ट्स आणि स्क्रीनशॉट्समधून अॅपची खालील फीचर्स प्रकाशात आली:

१. ट्विटरवरील ट्रेण्डिंग’ विभाग आणि फेसबुकवरील ट्रेण्ड्स’ ताब्यात घेणे

याचा अर्थ काय?

अ) अॅप ऑपरेटर्स व्यक्ती किंवा समूहांची ट्विट्स आणि पोस्ट्स ‘ऑटो-रिट्विट’ किंवा ‘ऑटो-शेअर’ करू शकतात.

ब) ते टोकाची कथने तयार करू शकतात आणि राजकीय प्रचारसभा प्रत्यक्षात जेवढ्या लोकप्रिय होत्या, त्याहून खूप अधिक प्रमाणात लोकप्रिय भासवल्या जाऊ शकतात.

हे चिंताजनक का आहे?

अ) काय खरे आहे आणि काय बनावट आहे हे समजणे कठीण होऊन बसते.

ब) अस्तित्वात असलेले प्रवाह स्पॅम करून, विशिष्ट समुदायांना व व्यक्तींना लक्ष्य करण्यासाठी तसेच त्यांना त्रास देण्यासाठी हे फीचर वापरले जाते.

वायरने याची पडताळणी कशी केली?

स्रोताने वेळेपूर्वी पुरवलेल्या दोन ट्रेण्डिंग हॅशटॅग्जच्या, प्लॅटफॉर्मवरील बनावट व संशयास्पद अॅक्टिव्हिटीवर, देखरेख ठेवून

‘द वायर’ने पडताळणी केली. हे हॅशटॅग्ज होते- #CongressAgainstLabourers आणि #कर्मयोगी

२. ‘निष्क्रिय’ व्हॉट्सअॅप अकाउंट्ची चोरी याचा अर्थ काय?

अ) अॅप ऑपरेटर्स नागरिकांच्या ‘निष्क्रिय’ व्हॉट्सअॅप अकाउंट्सचा ताबा घेऊ शकतात आणि त्यांच्या फोन नंबर्सचा वापर करून त्यांच्या ‘फ्रिक्वेंटली कॉण्टॅक्टेड’ किंवा ‘ऑल कॉण्टॅक्स्ट्स’ना मेसेजेस पाठवू शकतात.

ब) तुमची व्यक्तिगत माहिती आणि कॉण्टॅक्ट लिस्ट टेक फॉग अॅपवर अपलोड केली जाते आणि नंतर छळासाठी किंवा ट्रोलिंग मोहिमांसाठी वापरली जाऊ शकते.

हे चिंताजनक का आहे?

कारण, हे फीचर म्हणजे तुमच्या खासगीत्वाच्या (प्रायव्हसी) मूलभूत हक्काचे उल्लंघन आहे.

‘द वायर’ने याची पडताळणी कशी केली?

‘द वायर’ने, व्हॉट्सअॅपचा ताबा घेण्याचे रिअल-टाइम प्रात्यक्षिक आपल्या टीमसाठी देण्यास, स्रोताला सांगितले. प्रस्तुत लेखकांनी कस्टम टेक्स्ट मेसेज पुरवल्यानंतर काही मिनिटांमध्ये स्रोताने टेक फॉग अॅप वापरून, प्रस्तुत लेखकांपैकी एकाचे ‘निष्क्रिय’ व्हॉट्सअॅप अकाउंट्स ताब्यात घेऊन दाखवले आणि ताब्यात घेतलेल्या अकाउंटवरून कस्टम टेक्स्ट मेसेज त्याच्या ‘फ्रिक्वेंटली कॉण्टॅक्टेड’ नंबर्सना पाठवला.

३. नागरिकांचा डेटाबेस लक्ष्यीकृत छळासाठी वापरणे याचा अर्थ काय?

या अॅपकडे नागरिकांचा विस्तृत व बहुआयामी डेटाबेस असून, तो त्यांचा व्यवसाय, धर्म, भाषा, वय, लिंग व राजकीय विचारसरणी आणि अगदी त्वचेचा रंग व स्तनांचे आकारमान यांच्यानुसार वर्गीकृत करण्यात आलेला आहे.

हे चिंताजनक का आहे?

दृश्य स्वरूपातील पुरावा:

द वायरने’ याची पडताळणी कशी केली?

या अॅपमध्ये दाखवलेल्या एका लक्ष्यीकृत गटातील ‘स्त्री पत्रकाराला’ पाठवण्यात आलेल्या उत्तरांवर देखरेख ठेवून ‘द वायर’ने या फीचरची पडताळणी केली.

यातील अनेक उत्तरांमध्ये अॅपच्या स्क्रीनशॉट्समध्ये दाखवलेल्या एका किंवा त्याहून अधिक अश्लाघ्य कीवर्ड्सचा समावेश होता. याचा अर्थ लक्ष्यांचे वर्गीकरण विविध गटांत केल्यामुळे ऑपरेटिव्ह्ज त्यांना अत्यंत टोकदारपणे लक्ष्य करू शकतात.

मूळ लेख:

COMMENTS