राष्ट्रपतीपदाची निवडणूक भाजपसाठी किती सोपी?

राष्ट्रपतीपदाची निवडणूक भाजपसाठी किती सोपी?

नवी दिल्लीः नुकत्याच झालेल्या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत भाजपला उ. प्रदेश व उत्तराखंडमध्ये पूर्ण बहुमत मिळाले तर गोवा व मणिपूरमध्ये पुन्हा सरका

उत्तर प्रदेशात आगामी टप्पे भाजपसाठी कठीण
मोदीच शहांना खोडून काढत आहेत – विरोधकांची टीका
‘भारतीय गोबेल्सचा विजय’

नवी दिल्लीः नुकत्याच झालेल्या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत भाजपला उ. प्रदेश व उत्तराखंडमध्ये पूर्ण बहुमत मिळाले तर गोवा व मणिपूरमध्ये पुन्हा सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली असली तरी राष्ट्रपती पदाची निवडणूक भाजपसाठी सोपी नाही असे दिसून येते.

मात्र संसदेच्या दोन्ही सभागृहात भाजपची खासदार संख्या अधिक असल्याने त्यांच्यासाठी उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक सोपी आहे त्या मानाने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांसाठी भाजपपुढे बरीच आव्हाने आहेत.

जुलै २०१७मध्ये राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत माजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांना एनडीए पुरस्कृत उमेदवार राम नाथ कोविंद यांनी हरवले होते. कोविंद यांना सुमारे दोन तृतीयांश मते मिळाली होती. आता ५ वर्षांनंतर भाजपची त्यांच्या मित्र पक्षांसोबतची समीकरणे बदलली आहेत.

सदस्य संख्या रोडावल्याने निवडणूक आव्हानात्मक

उ. प्रदेशमधील २०१७च्या विधान निवडणुकांत भाजपने ३१२ जागा व त्यांचा मित्र पक्ष अपना दलने (सोनेलाल) यांनी ११ जागा जिंकल्या होत्या. पण जुलै २०२१मध्ये उ. प्रदेशातील एनडीएच्या जागा कमी होऊन ३१५ झाल्या. या विधानसभा निवडणुकांत भाजपने २५५ तर अपना दल (एस)ने १२ जागा जिंकल्या आहेत. त्या व्यतिरिक्त निर्बल इंडियन शोषित हमारा अपना दल (निषाद) या पक्षाने ६ जागा जिंकून एनडीएची एकूण सदस्य संख्या २७३ इतकी झाली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांत उ. प्रदेशमधील आमदारांच्या मतांचे मूल्य अधिक असते. या राज्याची लोकसंख्या अधिक असल्याने प्रत्येक मताचे मूल्य २०८ इतके झाले आहे.

भाजपच्या मित्रपक्षांना अन्य राज्यात कमी जागा मिळाल्या

लोकसभेची सदस्य संख्या ५४३, राज्यसभेची सदस्य संख्या २३३ व देशातील एकूण आमदार संख्या ४,१२० इतकी आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत प्रत्येक राज्यातल्या आमदाराच्या मताचे मूल्य वेगवेगळे धरले जाते. त्यामुळे त्याचा परिणाम अंतिमतः निव़डणुकांवर पडतो. खासदारांच्या मतांचे मूल्य मात्र प्रत्येकी ७०८ इतकेच निश्चित आहे.

देशात एकूण मतमूल्य १०.९८ लाख असून उ. प्रदेशातील आमदारांचे एकूण मतमूल्य ८३,८२४ इतके आहे. तर या राज्यातील खासदारांच्या मताचे मूल्य ५६,६४० इतके आहे. त्यामुळे एकट्या उ. प्रदेशाचे एकूण मतमूल्य १.४ लाख इतके आहे. हे मतमूल्य देशातील एकूण मतमूल्यांच्या १२.७ टक्के इतके आहे.

उ. प्रदेशापाठोपाठ उत्तराखंड, गोवा, मणिपूर व पंजाबमध्ये विधानसभा निवडणूक झाल्या. पंजाबमध्ये आमदाराचे मतमूल्य प्रत्येकी ११८ आहे, त्याच बरोबर उत्तराखंडमध्ये आमदाराचे मतमूल्य प्रत्येकी ६४, गोव्याचे २० व मणिपूरमध्ये १८ आहे.

भाजपने पंजाबवगळता अन्य चार राज्यात सत्ता मिळवली असतील काही जागा त्यांनी गमावल्याने त्यांची मतेही कमी झालेली आहे. जुलै २०२१मध्ये उत्तराखंडातील भाजपच्या जागा ५६ वरून ४७ वर आल्या. तर जुलै २०२१मध्ये मणिपूरमधील एनडीएच्या जागा ३६ वरून ३२ व जुलै २०२१मध्ये गोव्यातील जागा २८ वरून २०वर आल्या आहेत. पंजाबमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकांत इतक्याच दोन जागा भाजपला मिळाल्याने तेथे भाजपला ना फायदा झाला ना तोटा.

काही जय, काही पराभव

गेल्या काही वर्षांत भाजपचे अनेक मित्र पक्ष सोडून गेल्याने त्याचा परिणाम झाला आहे.

पंजाबमध्ये एकूण मतमूल्य १३,५७२ असून तेथील शिरोमणी अकाली दल पक्ष शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून सरकारमधून बाहेर पडला होता. त्याच प्रमाणे महाराष्ट्रात एकूण मतमूल्य ५०,४०० इतके असून शिवसेना व भाजपमध्ये काडीमोड झाल्याने त्याचा फटका भाजपला बसू शकतो.

२०१७च्या राष्ट्रपती निवडणुकांमध्ये एनडीएने ५.२७ लाख मते मिळवली होती. त्याच बरोबर या आघाडीला के. चंद्रशेखर राव यांच्या तेलंगण राष्ट्रसमिती व बिजू पटनाईक यांच्या बिजू जनता दल व जगन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसने मदत केली होती.

यंदा यापैकी एकाही पक्षाने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांत भाजपसोबत आपण असू याची घोषणी केलेली नाही.

आपचे भाजपपुढे आव्हान

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांत पंजाबमध्ये आपने मुसंडी मारत ११७ पैकी ९२ एवढ्या विक्रमी जागा मिळवल्या आहेत. त्यांच्या मतांचा भाजपला विचार करावा लागेल. आप आता स्वतःला काँग्रेसला पर्यायी पक्ष म्हणून पुढे आणत आहे हे या पार्श्वभूमीवर लक्षात घेतले पाहिजे.

येत्या एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान राज्यसभेच्या ७० जागा रिक्त होत आहेत. या ७० मधील ११ जागा उ. प्रदेशच्या, एक जागा उत्तराखंडची असून येथे भाजपला फारसे आव्हान नाही.

पण पंजाबमध्ये बहुमत मिळवल्याने आपला राज्यसभेच्या ६ जागा मिळतील. त्यामुळे त्यांचा राज्यसभेतील एकूण आकडा ९ इतका होईल. पंजाबमध्ये ७ राज्यसभेच्या जागा रिक्त होणार आहेत.

उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक भाजपला सोपी

येत्या ऑगस्टमध्ये उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक होत आहे. ही निवडणूक भाजपला आव्हानात्मक वाटत नाही. कारण या निवडणुकांत केवळ संसदेचे खासदारच मतदान करत असल्याने व भाजपचे बहुमत असल्याने त्यांच्यासमोर अन्य पक्षांचे आव्हान नाही.

या वर्षभरात ७ राष्ट्रपतीनियुक्त खासदारांबरोबर ७५ राज्यसभा खासदार निवृत्त होत आहेत. यातील ७३ जागांसाठीच्या निवडणुका राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकाआधी होणार आहेत. या ७३ पैकी ६६ सदस्य राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांत मतदान करणार आहेत. उ. प्रदेश, पंजाब, उत्तराखंडमधील १९ राज्यसभा जागा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांआधी रिक्त होणार आहेत. यातील १३ जागा पंजाबमधील असून त्या महिनाखेर रिक्त होणार आहे. जून अखेर २० जागा, जुलैमध्ये ३३ व ऑगस्टमध्ये २ जागा रिक्त होणार आहेत.

३१ मार्चला १३ राज्यसभा जागांसाठी निवडणुका होणार आहेत. भाजपला हिमाचल प्रदेशमध्ये एक जागा मिळण्याची शक्यता आहे. कारण येथून काँग्रेसचे खासदार आनंद शर्मा निवृत्त होत आहेत. त्याच बरोबर काँग्रेसचे आसाममधून राज्यसभा खासदार रिपून बोरा व राणी नाराह निवृत्त होत आहे. पुढील महिन्यात माकपचे झरन दास बैद्य निवृत्त होत आहेत.

मूळ बातमी 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: