‘फेसबुक इंडिया’च्या आंखी दास यांचा राजीनामा

‘फेसबुक इंडिया’च्या आंखी दास यांचा राजीनामा

नवी दिल्लीः भारतातील आपल्या व्यवसायाला धोका होऊ नये म्हणून भाजपचा राजकारणी व हिंदू राष्ट्रवादी गट आणि व्यक्ती यांना सोशल मीडियाचे द्वेषपूर्ण भाषणाचे न

फेसबुकच्या आँखी दास यांच्याकडून मोदींना थेट मदत
फेसबुकच्या धोरणावर कंपनीतल्या ११ कर्मचाऱ्यांचे पत्र
फेसबुकच्या आंखी दास यांची पोलिसांत तक्रार

नवी दिल्लीः भारतातील आपल्या व्यवसायाला धोका होऊ नये म्हणून भाजपचा राजकारणी व हिंदू राष्ट्रवादी गट आणि व्यक्ती यांना सोशल मीडियाचे द्वेषपूर्ण भाषणाचे नियम लावण्यास विरोध करणार्या फेसबुक इंडियाच्या भारतातील प्रमुख धोरण अधिकारी आंखी दास यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. आपल्या राजीनामा देण्यामागचे कारण त्यांनी यापुढे आपण सार्वजनिक जीवनात काम करणार आहोत असे दिले आहे. फेसबुक इंडियाने त्यांच्या राजीनाम्याची पुष्टी केली आहे.

नरेंद्र मोदी यांच्याबरोबर आंखी दास आणि फेसबुकचे अधिकारी.

नरेंद्र मोदी यांच्याबरोबर आंखी दास आणि फेसबुकचे अधिकारी.

गेले एक दशक त्या फेसबुक कंपनीच्या भारत, दक्षिण व मध्य आशियासाठी काम करत होत्या. आपल्या कार्यकाळात त्यांनी कंपनीच्या सार्वजनिक धोरणाची धुरा अधिक काळ सांभाळली होती. फेसबुकने त्यांच्या एक दशकाच्या कारकिर्दीचे योगदान अमूल्य असल्याचे म्हटले आहे.

गेल्या शुक्रवारी आँखी दास या संसदेच्या संयुक्त समितीपुढे हजर राहिल्या होत्या आणि त्यांनी संसद सदस्यांच्या अवघड प्रश्नांना उत्तरे दिली असे सूत्रांनी सांगितले होते.

या बैठकीत संसद सदस्यांनी फेसबुककडून जमा केलेल्या माहितीबाबत प्रश्न विचारले. ग्राहकांची माहिती गोळा करून आपले व्यावसायिक हित फेसबुकने जपू नये, असे सांगण्यात आल्याचे समजले होते. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला.

गेल्या ऑगस्टमध्ये अमेरिकेतील वॉल स्ट्रीट जर्नलने फेसबुकविरोधात वादळ उठवणारे वृत्त दिले होते. भारतातील आपल्या व्यवसायाला धोका होऊ नये म्हणून भाजपचा राजकारणी व हिंदू राष्ट्रवादी गट आणि व्यक्ती यांना सोशल मीडियाचे द्वेषपूर्ण भाषणाचे नियम लावण्यास फेसबुकच्या भारतातील वरिष्ठ अधिकारी आंखी दास यांनी विरोध केल्याचे वृत्त ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने प्रसिद्ध केले होते. या वृत्तात भाजपचे तेलंगणचे आमदार टी राजा सिंह यांच्या द्वेषपूर्ण भाषणाचा उल्लेख होता. हे आमदार धर्मांध भाषणे व वादग्रस्त वक्तव्ये करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्याविरोधात आंखी दास यांनी फेसबुकने निर्धारित केलेली चिथावणीखोर भाषणांविरोधातील नियमावली लावू नये अशी भूमिका घेतली होती.

“मोदी यांच्या पक्षातील नेत्यांच्या विरोधात कारवाई केल्यास त्याचा फेसबुकच्या भारतातील व्यवसाय संधींवर परिणाम होऊ शकेल, असे फेसबुकच्या वतीने भारत सरकारबरोबर लॉबींग करण्याची जबाबदारी असणाऱ्या दास यांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितल्याचे ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने वृत्तात म्हटले होते. हे वृत्त फेसबुकच्या काही माजी आणि सध्या कार्यरत असणार्या कर्मचाऱ्यांच्या हवाल्याने देण्यात आले होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0