पंजाब, हरयाणात जिओचे ग्राहक घटले

पंजाब, हरयाणात जिओचे ग्राहक घटले

नवी दिल्लीः मोदी सरकारच्या तीन वादग्रस्त शेती कायद्याविरोधात उफाळलेल्या शेतकरी आंदोलनाचा फटका पंजाब व हरयाणातील रिलायन्स जिओ कंपनीला जबर बसला आहे. मोद

राष्ट्रीय ई-कॉमर्स धोरण – एक गुंतावळ
आधार क्रमांक समाज माध्यमांशी जोडण्याची मागणी
देशात ओबीसी ४४.४ टक्के

नवी दिल्लीः मोदी सरकारच्या तीन वादग्रस्त शेती कायद्याविरोधात उफाळलेल्या शेतकरी आंदोलनाचा फटका पंजाब व हरयाणातील रिलायन्स जिओ कंपनीला जबर बसला आहे. मोदी सरकारचे तीन शेती कायदे अदानी व अंबानी या बड्या भांडवलदारांच्या हिताचे असल्याच्या शेतकरी संघटनांच्या भूमिकेमुळे रिलायन्स कंपनीच्या विरोधात जनतेत आक्रोश व संताप पसरला आहे. त्याचा परिणाम जिओचे ग्राहक कमी होताना दिसून आला.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार ट्रायने जाहीर केलेल्या डिसेंबर २०२०च्या आकडेवारीनुसार पंजाब व हरयाणात जिओचे ग्राहक झपाट्याने कमी झालेले दिसून आले आहेत. डिसेंबर अखेर पंजाबमध्ये जिओचे १ कोटी २५ लाख ग्राहक उरले आहेत जी गेल्या १८ महिन्यांतील सर्वाधिक कमी संख्या आहे. डिसेंबर २०१९मध्येही बीएसएनएल कंपनी वगळत्या पंजाब सर्कलमधील सर्व खासगी टेलिकॉम कंपन्यांची ग्राहक संख्या कमी झाली होती. त्यानंतर हा दुसरा धक्का बसला आहे.

पंजाबबरोबर हरयाणातही जिओ ग्राहकांची संख्या डिसेंबरमध्ये कमी दिसून आली. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये हरयाणातील जिओची ग्राहकसंख्या ९४.४८ लाख इतकी होती, ती डिसेंबर २०२०मध्ये ८९.०७ लाख इतकी दिसून आली.

गेल्या डिसेंबरमध्ये रिलायन्स जिओने अन्य प्रतिस्पर्धी कंपन्या भारती एअरटेल व व्होडोफोन या दोन कंपन्यांवर दुष्प्रचार व नकारात्मक माहिती पसरवली जात असल्याचा आरोप केला होता. आमची कंपनी शेतकरी आंदोलनाच्या विरोधात असल्याचा प्रचार या कंपन्यांकडून केला जात असल्याचे जिओचे म्हणणे आहे. रिलायन्स जिओने या संदर्भात ट्रायला एक पत्र लिहून भारती एअरटेल व व्होडाफोन-आयडिया कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी केली होती. पण या दोन कंपन्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते.

रिलायन्सने आपली कोणतीही साहाय्यक कंपनी कंत्राटी शेतीमध्ये नसल्याचे स्पष्ट करत आम्ही कोठेही जमीन खरेदी केलेली नाही, असे जाहीर केले होते.

ट्रायने दिलेल्या आकडेवारीनुसार डिसेंबर २०२०मध्ये देशात रिलायन्स जिओचे ४.७८ लाख ग्राहक व भारती एअरटेलचे ४०.५१ लाख ग्राहक वाढले असून व्होडाफोन-आयडियाचे ५६.९ लाख ग्राहक कमी झाले आहेत.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: