२०१६ मधील शेतकरी आत्महत्यांबाबतचा डेटा ३ वर्षांनंतर प्रकाशित

२०१६ मधील शेतकरी आत्महत्यांबाबतचा डेटा ३ वर्षांनंतर प्रकाशित

२०१६ मध्ये महाराष्ट्रातील आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ३,६६१ इतकी होती, जी देशात सर्वाधिक होती.

शेतकऱ्यांचा कळवळा की खासगी कंपन्यांना पायघड्या?
लॉकडाऊन आणि दुग्ध व्यावसायिक शेतकरी
मोदींच्या सुरक्षिततेला काँग्रेसकडून धोका: भाजप

२०१६ मध्ये एकूण ११,३७९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या भारतातील अपघाती मृत्यू आणि आत्महत्यांच्या शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालामध्ये गृहमंत्रालयाने दिली आहे. या आकड्याचा अर्थ दर महिन्याला ९४८ आत्महत्या किंवा दररोज ३१ आत्महत्या असा होतो.

२०१६ मध्ये ११,३७० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे सरकारने जुलै २०१८ मध्ये लोकसभेमध्ये  सांगितले होते मात्र हा डेटा तात्पुरता असून NCRB ने अजून अंतिम अहवाल दिले नसल्याचेही स्पष्ट केले होते.

अपघाती मृत्यू आणि आत्महत्यांबद्दलचा हा अंतिम अहवाल आता प्रकाशित करण्यात आला आहे. यापूर्वी २०१५ मध्ये अहवाल प्रकाशित करण्यात आला होता.

२०१४ मधील १२,३६० आणि २०१५ मधील १२,६०२ पेक्षा आत्महत्यांच्या संख्येत घट झाल्याचे दिसते. २०१६ साठी NCRB ने शेतकऱ्यांच्या आत्महत्येची कारणे काय याबद्दलची माहिती प्रकाशित केलेली नाही.

यामध्ये बहुतांश पुरुष शेतकरी असून महिलांची संख्या फक्त ८.६% इतकीच आहे. याचे एक कारण म्हणजे शेतावर काम करणाऱ्या बहुसंख्य महिलांना शेतकरी म्हणून ओळख नसते.

३,६६१ आत्महत्यांसह महाराष्ट्रातील आत्महत्यांची संख्या देशात सर्वाधिक आहे. २०१४ मध्ये ही संख्या ४,००४ आणि २०१५ मध्ये ४,२९१ होती.

महाराष्ट्रात २०१३ ते २०१८ या काळात एकूण १५,३५६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती एका आरटीआय अर्जावरील उत्तरात मिळाली आहे.

कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर असून २०१६ मध्ये तिथे २,०७९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, २०१५ मध्ये ती संख्या १,५६९ होती.

तेलंगणामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची संख्या निम्म्याहून अधिक घटली आहे. २०१४, १५ मध्ये १,३४७ आणि १,४०० असलेली ही संख्या २०१६ मध्ये ६४५ झाल्याचे NCRB च्या डेटावरून दिसते.

पश्चिम बंगाल राज्याने २०१५ व १६ मध्ये हा डेटा पुरवला नाही. २०१४ मध्ये तिथे २३० आत्महत्या नोंदवल्या गेल्या. मात्र २०१५ आणि २०१६ मध्ये एकही आत्महत्या नोंदवली गेली नाही. बिहार राज्यानेही २०१६ या वर्षात एकही आत्महत्या नोंदवली नाही. मात्र बिहार आणि पश्चिम बंगाल या दोन्ही ठिकाणी शेतकरी आत्महत्या होत असल्याच्या अनेक बातम्या आलेल्या आहेत.

२०१६ चा डेटा पकडून, १९९५ पासून भारतात ३,३३,४०७ आत्महत्या झाल्या आहेत. १९९५ पासूनच NCRB ने शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा डेटा प्रकाशित करण्यास सुरुवात केली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: