आंदोलन तीव्र करण्याची शेतकऱ्यांची रणनीती

आंदोलन तीव्र करण्याची शेतकऱ्यांची रणनीती

नवी दिल्लीः मोदी सरकारच्या ३ वादग्रस्त शेती कायद्यांच्या विरोधातील आंदोलन अधिक तीव्र करण्याच्या दृष्टीने शेतकरी संघटनांनी २३ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवा

शेती कायद्यावर सरकार मवाळ, पण पेच कायमच
शेतकऱ्यांना रोखण्यासाठी सिमेंट बॅरिकेड, काटेरी कुंपण, खंदक
‘ट्रॅक्टर रॅली’ संबंधित निर्णय पोलिसांनी घ्यावेत’

नवी दिल्लीः मोदी सरकारच्या ३ वादग्रस्त शेती कायद्यांच्या विरोधातील आंदोलन अधिक तीव्र करण्याच्या दृष्टीने शेतकरी संघटनांनी २३ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी दरम्यान अनेक कार्यक्रमांची घोषणा केली आहे. त्याच बरोबर हे आंदोलन दीर्घकाळ सुरू ठेवण्यासाठी नवी रणनीती तयार करण्यात येणार असल्याचे शेतकरी संघटनांनी सांगितले.

२३ फेब्रुवारीला ‘पगडी संभाल दिवस’, २४ फेब्रुवारीला ‘दमनविरोधी दिवस’ साजरा केला जाणार आहे. या दोन दिवसांत शेतकर्यांचा आदर राखला जावा, त्यांच्याविरोधात कोणतेही दमनकारी कारवाई केली जाऊ नये, असे आवाहन करण्यात येणार आहे.

‘पगडी संभाल दिवसा’च्या निमित्ताने चाचा अजित सिंह व सहजानंद सरस्वती यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात येईल. या दिवशी सर्व आंदोलक शेतकरी, पगडी घालतील असे शेतकरी नेते दर्शनपाल यांनी सांगितले.

२४ फेब्रुवारीच्या दमनविरोधी दिवशी प्रत्येक तहसील व जिल्हा मुख्यालयाला राष्ट्रपतींना देण्यात येण्यासाठी एक निवेदन देण्यात येईल. शिवाय दमनकारी यंत्रणांच्या विरोधात निदर्शने करण्यात येतील.

त्यानंतर २६ फेब्रुवारीला युवा किसान दिवस, २७ फेब्रुवारीला मजदूर किसान एकता दिवस साजरा करण्यात येणार आहे.

युवा किसान दिवशी आंदोलनातील तरुणांचा सत्कार केला जाईल. या दिवशी सर्व शेतकरी संघटनांच्या व्यासपीठावर युवकांना संधी देण्यात येईल.

२७ फेब्रुवारीला गुरु रविदास जयंती व शहीद चंद्रशेखर आझाद यांच्या शहीद दिनाच्या निमित्ताने किसान मजदूर एकता दिवस साजरा केला जाणार आहे.

शेतकरी आंदोलन दीर्घकाळ ठेवण्याच्या दृष्टीने शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. या संदर्भात स्वराज इंडियाचे नेते योगेंद्र यादव म्हणाले, सरकार शेतकरी आंदोलकांची धरपकड करत आहे, त्यांच्यावर दमनशाही करत आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत. सिंघू सीमा सील करण्यात आली आहे. ही वेश आंतरराष्ट्रीय सीमेसारखी वाटत आहे, या संदर्भात शेतकरी संघटना आपली रणनीती बदलणार आहे. येत्या ८ मार्चपासून संसदेचे अधिवेशन होणार असून ते डोळ्यासमोर ही रणनीती आखली जाणार असल्याचे यादव म्हणाले.

दरम्यान २६ जानेवारीच्या दिवशी ट्रॅक्टर परेडदरम्यान दिल्लीत हिंसाचार झाला होता. त्या संदर्भात १२२ जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यातील केवळ ३२ जणांना जामीन मिळाला असल्याची माहिती शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी दिली.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: