शेतकरी आंदोलनाला पाठिंबाः अर्जुन, पद्मश्री पुरस्कार परत

शेतकरी आंदोलनाला पाठिंबाः अर्जुन, पद्मश्री पुरस्कार परत

चंदीगडः राजधानी नवी दिल्लीच्या वेशीवर येऊन थडकलेल्या शेतकरी आंदोलनाच्या प्रतिक्रिया क्रीडा क्षेत्रातूनही येऊ लागल्या आहे. सरकारकडून शेतकर्यांवर होत अस

‘शाहीन बाग रस्ता मोकळा व्हावा’
एनआरसीवरून गोंधळात गोंधळ
दिल्लीत सीएए आंदोलनात एका हवालदारासह ४ ठार

चंदीगडः राजधानी नवी दिल्लीच्या वेशीवर येऊन थडकलेल्या शेतकरी आंदोलनाच्या प्रतिक्रिया क्रीडा क्षेत्रातूनही येऊ लागल्या आहे. सरकारकडून शेतकर्यांवर होत असलेल्या दडपशाहीचा निषेध म्हणून काही अर्जुन व पद्मश्री पुरस्कार विजेत्यांनी आपले पुरस्कार सरकारला परत देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यात पद्मश्री व अर्जुन पुरस्कार विजेते कुस्तीपटू कर्तार सिंह, अर्जुन पुरस्कार विजेते सज्जन सिंह चीमा व अर्जुन पुरस्कार विजेते हॉकीपटू राजबीर कौर यांचा समावेश असून पंजाब व हरयाणातील क्रीडा विश्वही शेतकर्यांच्या बाजूने उभे राहात असल्याचे चित्र दिसू लागले आहे. पंजाबमधील अर्जुन पुरस्कार व पद्मश्री पुरस्कार मिळवलेले किमान १५० क्रीडापटू आपले पुरस्कार परत करतील असे बोलले जात आहे.

हे सर्व क्रीडापटू ५ डिसेंबरला राष्ट्रपती भवनाच्या बाहेर आपले पुरस्कार ठेवणार आहेत.

मंगळवारी जालंधर प्रेस क्लबमध्ये ऑलिम्पिक हॉकीपटू चीमा यांनी पत्रकार परिषद घेऊन आम्ही शेतकर्यांची मुले आहोत. गेले काही दिवस शांततेत आंदोलन सुरू होते या दरम्यान कोणताही हिंसाचार झाला नाही. पण जेव्हा शेतकरी दिल्लीकडे कूच करू लागले तेव्हा त्यांच्यावर अश्रुधूर व थंड पाण्याच्या मारा करण्यात आला. जर आमच्या घरातल्या मोठ्यांचा सन्मान सरकार ठेवत नसेल तर त्या पुरस्कारांचा आम्हाला काय उपयोग असा सवाल करत आम्ही शेतकर्यांच्या समर्थनार्थ हे पुरस्कार सरकारला परत करत आहोत, असे चीमा म्हणाले.

या पत्रकार परिषदेत अर्जुन पुरस्कार विजेते ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक विजेते हॉकीपटू गुलमेल सिंह, भारतीय हॉकी टीमचे माजी कप्तान राजबीर कौर उपस्थित होते. राजबीर कौर यांना गोल्डन गर्ल म्हटले जाते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: