प्रजासत्ताकदिनी ट्रॅक्टर परेडचा शेतकऱ्यांचा इशारा

प्रजासत्ताकदिनी ट्रॅक्टर परेडचा शेतकऱ्यांचा इशारा

नवी दिल्लीः मोदी सरकारचे ३ शेती कायदे रद्द करणे व किमान हमी भावाचा नवा कायदा आणणे या मागण्यांवर देशातल्या सर्व शेतकरी संघटना कायम असून या मागण्या मान्

मंडई कर गरजेचाः अर्थ खात्याचे मत
शेती कायदे स्थगित करावे, सुप्रीम कोर्टाचा तोडगा
‘ट्रॅक्टर रॅली’ संबंधित निर्णय पोलिसांनी घ्यावेत’

नवी दिल्लीः मोदी सरकारचे ३ शेती कायदे रद्द करणे व किमान हमी भावाचा नवा कायदा आणणे या मागण्यांवर देशातल्या सर्व शेतकरी संघटना कायम असून या मागण्या मान्य न झाल्यास येत्या २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या दिशेने ट्रॅक्टर परेड काढण्यात येईल, असा इशारा या संघटनांनी दिला आहे.

२६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे हे ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

शनिवारी शेतकरी नेते दर्शन पाल सिंह यांनी एक पत्रकार परिषद घेऊन शेतकर्यांचे संचलन प्रजासत्ताक दिनाच्या संचलनानंतर सुरू होईल असे सांगितले.

ते म्हणाले, ४ जानेवारीची चर्चा अपयशी ठरली तर शेतकरी सिंघू बॉर्डर ते कुडली-मानेसर-पलवल एक्स्प्रेस मार्गावर आपला मोर्चा काढतील व अन्य एक मोर्चा शाहजहांपूर येथे आंदोलनास जमा झालेले शेतकरी दिल्लीकडे काढतील.

तर स्वराज इंडियाचे नेते योगेंद्र यादव यांनी सरकारवर टीका केली आहे. शेतकर्यांच्या ५० टक्के मागण्या आपण मान्य केल्या असा दावा सरकारकडून केला जात आहे, पण हा दावा खोटा व दिशाभूल करणारा असल्याचे त्यांनी सांगितले. आम्हाला सरकारने काहीही लेखी स्वरुपात दिलेले नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. चर्चा अपयशी झाल्यास हरयाणा-राजस्थान सीमेवरील शहाजहांपूर येथील शेतकरी दिल्लीकडे कूच करतील, असेही त्यांनी अन्य एका प्रश्नावर सांगितले.

तर अन्य एक शेतकरी नेते गुरनाम सिंह चढूनी यांनी सरकार २३ पीकांवर किमान हमी भाव देण्यास तयार नाही असे सांगितले.

अन्य एक शेतकरी नेते विकास यांनी ४ जानेवारीची बैठक अयशस्वी ठरल्यास काही दिवसांत हरयाणातील सर्व मॉल, पेट्रोल पंप बंद ठेवण्यात येतील असा इशारा दिला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0