शेतकरी संघटना-सरकारची ८ वी फेरीही निष्फळ

शेतकरी संघटना-सरकारची ८ वी फेरीही निष्फळ

दिल्ली : मोदी सरकारने तीन शेती कायदे घ्यावेत म्हणून दिल्लीच्या वेशीवर गेले ४४ दिवस सुरू असलेले आंदोलन चिघळण्याची चिन्हे आहेत. शुक्रवारी सरकार व शेतकरी

हट्ट सोडा व शेतकऱ्यांशी चर्चा करा; मोदींना पत्र
मागण्या मान्य करा; ११ पक्षांची केंद्र व राज्याला विनंती
शेती कायदे मागे; पंजाबमध्ये काय घडू शकेल?

दिल्ली : मोदी सरकारने तीन शेती कायदे घ्यावेत म्हणून दिल्लीच्या वेशीवर गेले ४४ दिवस सुरू असलेले आंदोलन चिघळण्याची चिन्हे आहेत. शुक्रवारी सरकार व शेतकरी संघटना यांच्यातील ८ वी फेरीही निष्फळ ठरली. सरकारने कोणत्याही परिस्थिती ३ शेती कायदे मागे घेणार नाही पण या विषयावर येत्या १५ जानेवारी रोजी पुन्हा शेतकरी संघटनांशी चर्चा केली जाईल, असे स्पष्ट केले.

द वायरला मिळालेल्या माहितीनुसार शेती कायदे रद्द करण्याची जी मागणी शेतकरी संघटना करत आहेत, तो विषय आता सर्वोच्च न्यायालयाकडून सोडवणेच हिताचे आहे, असा पवित्रा सरकारने घेतला आहे. तर हे कायदे जो पर्यंत रद्द होत नाही तो पर्यंत आंदोलन होत राहील, मरण येईपर्यंत हा संघर्ष पुढे नेला जाईल. हा विषय न्यायालयाकडे नेण्याचा मुद्दाच उपस्थित होत नाही, तो पर्यायच नाही, असे शेतकरी नेते हन्नान मोलाह यांनी स्पष्ट केले. काही शेतकरी नेत्यांनी एकतर आम्ही विजय मिळवू अन्यथा प्राण देऊ असा पवित्रा घेतला आहे.

जोगिंदर सिंह उग्रहन या शेतकरी नेत्याने सरकार आमची परीक्षा घेत असल्याचा आरोप केला. आमचा मनोनिश्चय तुटावा म्हणून सरकार वेळ काढत आहेत. आम्ही सरकारपुढे झुकणार नाही. येणारा लोहरी व बैसाखी सण इथेच होईल असे वाटत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

शुक्रवारच्या बैठकीत शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी सरकारकडून जेवण व चहाही घेण्यास नकार दिला.

दरम्यान चर्चेची ८ वी फेरीही निष्फळ ठरल्यानंतर विविध शेतकरी संघटनांनी आपली आगामी रणनीती ठरवण्यासाठी तयारी सुरू केली आहे. शेतकरी संघटना प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर विशाल ट्रॅक्टर परेडही काढण्याच्या तयारीत आहेत.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: