फारुख अब्दुल्ला सर्वपक्षीय चर्चेस तयार

फारुख अब्दुल्ला सर्वपक्षीय चर्चेस तयार

श्रीनगरः ३७० कलम रद्द केल्यानंतर जम्मू व काश्मीरमधील बदलेली परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला आता सर्व पक्षांच्या

ठाणे-दिवा ५ वी आणि ६ वी मार्गिका अखेर पूर्ण
जेएनयू : एक महान विद्यापीठ बरबाद झाले त्याची गोष्ट
असे झालेच नव्हते!

श्रीनगरः ३७० कलम रद्द केल्यानंतर जम्मू व काश्मीरमधील बदलेली परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला आता सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करण्याचे प्रयत्न करत आहेत. ही चर्चा ‘गुपकार जाहीरनामा’ या संकल्पनेखाली होईल, असे अब्दुल्ला यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

गेल्या वर्षी ४ ऑगस्टला काश्मीरच्या प्रश्नांविषयी चर्चा करण्यासाठी फारुख अब्दुल्ला यांनी आपल्या निवासस्थानी भाजप सोडून अन्य सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांना बोलावले होते. या चर्चेत ३७० व ३५ अ  कलमात बदल करण्याचे सरकारचे प्रयत्न, काश्मीरची स्वायतत्ता, विशेषाधिकार असे विषय घेतले होते. पण दुसर्या दिवशीच संसदेत ३७० व ३५ अ कलम रद्द करण्यात आले व काश्मीरमधील सर्व राजकीय नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आले होते. गेले वर्षभर काश्मीरमध्ये बर्याच राजकीय, आर्थिक, सामाजिक घडामोडी घडल्या. त्यांचा आढावा व आगामी रणनीती ठरवण्यासाठी गेल्या १५ ऑगस्टला अब्दुल्ला यांनी पुन्हा गुपकार जाहीरनामाच्या संकल्पनेखाली सर्व विरोधी पक्ष नेत्यांना चर्चेस बोलावले होते. पण सरकारने ही बैठक होऊ दिली नाही. पण ही बैठक लवकरच घेतली जाईल, असे अब्दुल्ला यांनी सांगितले. गुपकार जाहीरनाम्याच्या चौकटीत आता सर्व विषय चर्चिले जातील, यासाठी पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांच्याशीही संवाद साधला जाईल, व भाजपसोडून सर्वपक्षीय अजेंडा आखला जाईल, असे अब्दुल्ला यांनी सांगितले.

मेहबुबा यांच्याशी आपला संपर्क असून सर्व नेत्यांना तुरुंगातून, नजरकैदेतून सोडल्यास काश्मीरमधील राजकीय घडामोडींना वेग येईल, असे अब्दुल्ला म्हणाले.

दरम्यान गुरुवारी अब्दुल्ला यांनी बैठक घेण्यामागील एक कारण म्हणजे गेल्या वर्षी ५ ऑगस्टपासून नॅशनल कॉन्फरन्सच्या १६ नेत्यांना बेकायदा तुरुंगात टाकणे व नजरकैदेत ठेवणे या संदर्भात या पक्षाने जम्मू व काश्मीर उच्च न्यायालयात याचिका टाकण्यात आली आहे. या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली. त्यावेळी जम्मू व काश्मीर प्रशासनाने या पक्षाच्या नेत्यांवर कोणतीही बंधने नसल्याचे न्यायालयात सांगितले. त्यानंतर अब्दुल्ला यांनी आपल्या पक्षाच्या काही सदस्यांची एक बैठक घेतली.

ही बैठक श्रीनगरमधील गुपकार रोडवरील अब्दुल्ला यांच्या निवासस्थानी झाली. त्यानंतर अब्दुल्ला यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, काश्मीरमधील परिस्थिती अत्यंत दयनीय असून जनता वेदनेत जगत आहेत. राज्यातील सर्व व्यापार थंडावला आहे. पर्यटनही थंडावले आहे. कोरोनाने अनेकांचे बळी घेतलेले आहेत.

शाह फैसल यांच्या निर्णयावर अब्दुल्ला यांनी, एखाद्याची स्वतःची भूमिका कमकुवत असेल त्याला अब्दुल्ला जबाबदार नाही. त्याने स्वतःच्या आतल्या आवाजाला व परमेश्वराला उत्तर दिले पाहिजे. या विषयावर बोलण्यासारखे काही नाही. ते गेले त्यात काय?, असे उत्तर दिले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0