स्टॅन स्वामींच्या कार्याचा आदरः मुंबई हायकोर्टाकडून स्तुती

स्टॅन स्वामींच्या कार्याचा आदरः मुंबई हायकोर्टाकडून स्तुती

मुंबईः आदिवासी हक्कांसाठी आपले अखंड आयुष्य खर्च केलेले दिवंगत ख्रिश्चन धर्मगुरु स्टॅन स्वामी यांच्या सामाजिक कार्याबद्दल सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाक

ईडीचे गुन्हे असल्याने सिद्दिक कप्पन अजूनही तुरुंगातच
तिस्ता सेटलवाड, श्रीकुमार यांचे जामीन अर्ज फेटाळले
राजीव गांधी हत्याप्रकरणातील दोषी पेरारिवलानला जामीन

मुंबईः आदिवासी हक्कांसाठी आपले अखंड आयुष्य खर्च केलेले दिवंगत ख्रिश्चन धर्मगुरु स्टॅन स्वामी यांच्या सामाजिक कार्याबद्दल सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाकडून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. फादर स्टॅन स्वामी हे व्यक्तिमत्व अफलातून होते, आदिवासींच्या अधिकाराबद्दल त्यांनी केलेल्या कार्याबद्दल आपल्याला आदर आहे, असे मत न्या. एस. एस. शिंदे व न्या. एन.जे. जमादार यांनी व्यक्त केले. भीमा कोरेगाव, एल्गार परिषद प्रकरणावरून फादर स्टॅन स्वामी यांच्याविरोधात जी काही कायदेशीर कारवाई सुरू आहे तो भाग वेगळा आहे पण त्यांचे सामाजिक कार्य उल्लेखनीय असल्याचे न्यायालयाने म्हटले.

फादर स्टॅन स्वामी यांचा दफनविधी केव्हा होणार याची माहिती आपल्याला देण्यात आली होती. टीव्हीवर फादर स्वामी यांच्या दफनविधीदरम्यानची प्रार्थना आम्ही पाहिली, ती आकर्षक होती. त्यांचे व्यक्तिमत्व अफलातून होते, समाजासाठी त्यांनी ज्या प्रकारे सेवा केली तिचा आदर असल्याचे न्या. शिंदे म्हणाले.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपल्याला जामीन मिळावा अशी याचिका गेल्या ५ जुलैला फादर स्टॅन स्वामी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. पण त्यांचे मुंबईत होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये निधन झाले. फादर स्टॅन स्वामी यांच्या निधनाची नोंद न्यायालयाने घेऊन चौकशी करण्यास सांगितले होते.

न्यायालयाने, आम्ही फादर स्टॅन स्वामी यांना वैद्यकीय उपचार मिळतील यासाठी व्यवस्थाही केल्याचे सांगितले. स्वामी यांच्या वकिलांनी २६ मे रोजी त्यांची तब्येत बिघडल्याचे सांगितल्यानंतर आम्ही लगेच त्यांना चांगले वैद्यकीय उपचार मिळतील अशी व्यवस्था केली होती. नंतर ५ जुलैला स्वामी यांच्या निधनाचे वृत्त डॉक्टरांनी कळवल्यानंतर तेव्हा वाईट वाटले. जे काही घडले ते दुर्दैवी होते, त्याची कल्पनाही केली गेली नव्हती. आम्ही प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेत होतो, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

यावर स्वामी यांचे वकील मिहीर देसाई यांनी न्यायालय व रुग्णालयांविषयी आपली काही तक्रार नाही असे सांगितले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0