‘अर्जुनाच्या बाणात अण्वस्त्रे, तर रामायणात पुष्पक विमान’

‘अर्जुनाच्या बाणात अण्वस्त्रे, तर रामायणात पुष्पक विमान’

कोलकाता : विमानाचा शोध १९१०-११ मध्ये लागला असला तरी आपल्या प्राचीन काळावर एक नजर टाकल्यास रामायण काळात आपल्याकडे पुष्पक विमान होते, महाभारतात अर्जुनाच

भाजपची ७५ लाख रोजगार कार्डची घोषणा मागे
प. बंगालमध्ये भाजपची मुसंडी, तृणमूल बचावात्मक
बंगाल विधानसभाही नागरिकत्व कायद्याच्या विरोधात

कोलकाता : विमानाचा शोध १९१०-११ मध्ये लागला असला तरी आपल्या प्राचीन काळावर एक नजर टाकल्यास रामायण काळात आपल्याकडे पुष्पक विमान होते, महाभारतात अर्जुनाच्या बाणात अण्वस्त्रे होती तर महाभारत युद्धाचे थेट वृत्तांकन संजय आपल्या दिव्यदृष्टीद्वारे राजा धृतराष्ट्राला करत होता, असे विधान प. बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी केले आहे. कोलकाता येथे एका विज्ञान मेळाव्याचे उद्घाटन करताना त्यांनी हे विधान केले. भारत हा प्राचीन काळी आधुनिक होता याकडे आताचे जग दुर्लक्ष करू शकत नाही, असेही ते म्हणाले.

दरम्यान राज्यपालांच्या अशा विधानावर बंगालचे एक वैज्ञानिक विकास सिन्हा यांनी जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, राज्यपालांचे हे विधान ऐकल्यावर त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असावे असे वाटते. एक वैज्ञानिक म्हणून मला अशी विधाने करणाऱ्या लोकांकडे पाहून प्रचंड संताप येतो. पण ही मंडळी आपला दावा खरा आहे हे दाखवण्यासाठी पुराणातील, महाभारत-रामायणातले दाखले देतात हे अत्यंत संतापजनक आहे. राज्यपालपदी असलेल्या व्यक्तीने असे दाखले देणे या पदाला शोभा देणारे नाही. त्यांनी आपले लक्ष अन्य गोष्टींकडे केंद्रीत करून शांत बसावे असा सल्लाही विकास सिन्हा यांनी दिला.

तर आणखी एक वैज्ञानिक संदीप चक्रवर्ती यांनी अशा विधानांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या भारताच्या वैज्ञानिक प्रगतीवर व प्रतिमेवर कलंक लागतो अशी प्रतिक्रिया दिली.

गेल्या वर्षी जुलै महिन्यात बंगालच्या राज्यपालपदाची सूत्रे घेतल्यानंतर लगेचच जगदीश धगखड यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी संघर्ष सुरू केला होता.

आजपर्यंत प्राचीन भारतातल्या वैज्ञानिक प्रगतीबद्दल अनेक राजकीय नेत्यांनी असे हास्यास्पद दावे केले आहेत. या पूर्वी त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव देव यांनी महाभारताच्या काळात इंटरनेट होते असे विधान केले होते. नंतर उ. प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी सीता ही टेस्ट ट्यूब बेबी होती, असे विधान केले होते तर पुद्दुचेरीच्या राज्यपाल किरण बेदी यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत ‘नासा’चा हवाला देत सूर्याच्या आवाजातून ‘ओम’ शब्दाचा जप होत असल्याचा दावा केला होता.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: