रमझान घरातच पाळाः राज्य सरकारच्या सूचना

रमझान घरातच पाळाः राज्य सरकारच्या सूचना

मुंबईः १४ एप्रिल ते १३ मे २०२१ पर्यंत मुस्लिमांचा पवित्र रमजान महिना साजरा केला जात आहे. रमजान महिन्यात मुस्लिम समाजामध्ये मोठ्या संख्येने मशिदीमध्ये

बुद्धीमान बंडखोर लेखिका
सेंट्रल व्हिस्टाचे फोटो व व्हीडिओ काढण्यास बंदी
प्रमाणभूत भाषिक धारणांचे पुनर्मूल्यांकन गरजेचे – भाग १

मुंबईः १४ एप्रिल ते १३ मे २०२१ पर्यंत मुस्लिमांचा पवित्र रमजान महिना साजरा केला जात आहे. रमजान महिन्यात मुस्लिम समाजामध्ये मोठ्या संख्येने मशिदीमध्ये जाऊन सार्वजनिकरित्या नमाज पठण करण्याची प्रथा आहे. या कालावधीत मुस्लिम नमाज, तरावीह व इफ्तारसाठी एकत्र येतात. राज्यात सुरु असलेला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता या वर्षी रमजान महिना साधेपणाने साजरा करण्याचा मार्गदर्शक सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. त्यांची अमलबजावणी करणे  आवश्यक असल्याचे सरकारच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. 

मार्गदर्शक सूचना

१. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी रमजान महिन्यात मुस्लिमांनी नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तारसाठी मशिदीमध्ये अथवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता सर्व धार्मिक कार्यक्रम आपापल्या घरातच साजरे करावेत. नमाज पठणाकरिता मशिदीत तसेच मोकळ्या जागेत एकत्र येऊ नये.

२. सार्वजनिक ठिकाणी एकावेळी ५ पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र न येता सोशल डिस्टन्सींग व स्वच्छतेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे (मास्क. सँनिटायझर इत्यादी) पालन करून रमजान महिना अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात यावा.

३. या महिन्यात मुस्लिम धर्मीय ३० दिवस दररोज पहाटेपासून उपवास ठेवतात व संध्याकाळी मगरीब नमाज पूर्वी उपवास सोडतात. या सेहरी व इफ्तारच्या वेळी अनेक फळ व इतर अन्नपदार्थ विक्रेते गर्दी करण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने स्थानिक प्रशासनाने याबाबत योग्य ती उपाययोजना करावी.

४. रमजान महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी दुवा पठण (अलविदा जुम्मा) करण्याची प्रथा आहे. त्यासाठी मुस्लिम धर्मिय मोठ्या प्रमाणात मशिदीमध्ये येऊन दुवा पठण करतात. परंतु यावेळी कोविड १९ चा वाढता प्रादुर्भाव पाहता कोणीही मशिदीमध्ये दुवा पठणाकरिता एकत्र जमू नये, आपापल्या घरातच दुवा पठण करावे.

५. शब-ए-कदर ही रात्र रमजान महिन्याच्या २६ व्या दिवशी साजरी करण्याची प्रथा आहे. या निमित्ताने मुस्लिम धर्मीय तरावीह नमाज संपल्यानंतर आपल्या विभागातील मशिदीमध्ये रात्रभर कुराण पठण व नफील नमाज पठण करतात. परंतु यावर्षी सर्वांनी धार्मिक कार्यक्रम आपापल्या घरात राहूनच करावेत.

६. रमजान महिन्यात बाजारामध्ये सामान खरेदीकरिता गर्दी करू नये किंवा एकत्र जमू नये, तसेच याबाबत स्थानिक प्रशासनाने सामान खरेदीसाठी वेळेचे बंधन घालून दिले असल्यास त्याचे तंतोतंत पालन करण्यात यावे.

७. धार्मिक स्थळे बंद असल्याने वाझ कार्यक्रमांचे आयोजन शासनाच्या नियमांचे पालन करुन शक्यतो ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात यावेत.

८. कोविड-१९ या विषाणूच्या अनुषंगाने राज्यात १४४ कलम लागू असल्याने तसेच रात्रीची संचारबंदी असल्यामुळे फेरीवाल्यांनी रस्त्यावर स्टॉल लावू नयेत. तसेच नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये.

९. या रमजान महिन्यात कोणत्याही प्रकारे मिरवणुका, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक अथवा राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये.

१०. धार्मिक स्थळे बंद असल्याने मुस्लिम धर्मगुरु, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून रमजान महिना साधेपणाने साजरा करण्याच्या अनुषंगाने जनजागृती करण्यात यावी.

११. रमजान महिन्यात सोशल डिस्टंन्सिगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे.

१२.कोविड-१९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच प्रत्यक्ष रमजान सण सुरू होण्याच्या व चालू असतानाच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचेदेखील अनुपालन करावे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: