विदेशी गुंतवणूकदारांकडून ६२०० कोटी मागे

विदेशी गुंतवणूकदारांकडून ६२०० कोटी मागे

नवी दिल्ली :  वैश्विक आर्थिक मंदी व व्यापार युद्ध भडकल्याने ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात देशाच्या अर्थव्यवस्थेत गुंतवलेले ६२०० कोटी रुपये

ओला, उबर आणि नया दौर
आसाममध्ये जमावाकडून डॉक्टरची हत्या, २१ अटकेत
७,७१२ कोटींची परकीय गुंतवणूक माघारी

नवी दिल्ली :  वैश्विक आर्थिक मंदी व व्यापार युद्ध भडकल्याने ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात देशाच्या अर्थव्यवस्थेत गुंतवलेले ६२०० कोटी रुपये विदेशी गुंतवणूकदारांनी काढून घेतले आहेत.

१ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर या काळात शेअर बाजारातून ४९५५ कोटी रु. तर कर्जरोख्यातील १२६१ कोटी रु. विदेशी गुंतवणुकदारांनी काढून घेतल्याची माहिती आहे.

गेल्या महिन्यात विदेशी गुंतवणुदारांनी ६५५७ कोटी रु. अर्थव्यवस्थेत गुंतवले होते. पण काही दिवसांपूर्वी मूडीज व अन्य पतमापन करणाऱ्या संस्थांनी भारताचा जीडीपी घसरणार असल्याचे भाकित केल्याचा परिणाम विदेशी गुंतवणुकदारांवर पडला असल्याचेही एक कारण सांगितले जात आहे.

भारताचा आर्थिक विकास दर २०१८-१९ दरम्यान ६.९ इतका राहील असा अंदाज जागतिक बँकेने व्यक्त केला होता. पण काही दिवसांपूर्वी बँकेने आपला अंदाज ६ टक्के होईल असे स्पष्ट केले होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: