मेहुल चोक्सी अँटिग्वातून फरार

मेहुल चोक्सी अँटिग्वातून फरार

नवी दिल्लीः कॅरिबियन बेट समुहातील अँटिग्वा व बर्म्युडामध्ये राहणारा हिरे व्यापारी मेहुल चोक्सी (६२) फरार झाल्याचे तेथील रॉयल पोलिस फोर्सचे म्हणणे आहे.

‘आम्ही सगळे जेएनयू’ असे ठणकावून सांगण्याची वेळ आली आहे
‘मंदिरातील प्रसादावर, त्या दिवस ढकलत आहेत’
महाविकास आघाडीचा दावा सादर

नवी दिल्लीः कॅरिबियन बेट समुहातील अँटिग्वा व बर्म्युडामध्ये राहणारा हिरे व्यापारी मेहुल चोक्सी (६२) फरार झाल्याचे तेथील रॉयल पोलिस फोर्सचे म्हणणे आहे. मेहुल चोक्सी अँटिग्वा व बर्म्युडाचा नागरिक आहे.

पंजाब नॅशनल बँकेतील १३,५०० कोटी रु.च्या कथित भ्रष्टाचाराप्रकरणी भारतीय तपास यंत्रणा मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा प्रयत्न करत असताना चोक्सी अँटिग्वातून फरार झाल्याने अडचणी वाढल्या आहेत. जानेवारी २०१८पासून चोक्सी अँटिग्वामध्ये राहात होता.

चोक्सी फरार झाल्यानंतर इंटरपोलने त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावली असून चोक्सीचे फरार होण्याचे वृत्त सीबीआय औपचारिक व अनौपचारिक पातळीवर पडताळून पाहात आहे. तर चोक्सीचे वकील विजय अग्रवाल यांनी आपला अशील फरार झाल्याचे म्हटले आहे.

गेल्या रविवारी चोक्सीला कारमधून जाताना पाहण्यात आले होते. ती कार पोलिसांनी जप्त केली आहे.

चोक्सी हा पीएनबी घोटाळ्यातील आणखी एक प्रमुख आरोपी नीरव मोदी याचा काका असून नीरव मोदीलाही भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नीरव मोदी सध्या लंडनमध्ये असून त्याच्या प्रत्यर्पणाची प्रक्रिया सुरू आहे.

पीएनबीमध्ये सुमारे १३ हजार कोटी रु.चा घोटाळा झाला असून चोक्सीने ७,०८०.८६ कोटी रु. तर मोदीने ६ हजार कोटी रु.चा घोटाळा केल्याचा भारतीय तपास यंत्रणांचा दावा आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0