जीडीपी ७.५ टक्के घसरला

जीडीपी ७.५ टक्के घसरला

नवी दिल्लीः आर्थिक वर्षाच्या दुसर्या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर २०) देशाचा जीडीपी ७.५ टक्के घसरला असून तांत्रिकदृष्ट्या अर्थव्यवस्था मंदीत जात असल्याची माहिती शुक्रवारी राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाने प्रसिद्ध केली. देश आर्थिक मंदीत जात असल्याचा अंदाज काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँकेने वर्तवला होता.

अर्थव्यवस्था मंदीत जात असली तरी मागणी व पुरवठाच्या पातळीवर अर्थव्यवस्था पुन्हा तेजीत येईल व चालू वित्तीय वर्षाच्या अखेरच्या तिमाहीत तसे बदल दिसू लागतील असेही आयोगाचे म्हणणे आहे.

दरम्यान पायाभूत उद्योगांची ऑक्टोबरमधील कामगिरी गेल्या वर्षाच्या तुलनेत खराब दिसत असून उत्पादन २.५ टक्क्याने घसरले आहे. खनिज तेल, नैसर्गिक वायू, पेट्रोलियम शुद्धीकरण व पोलाद उद्योगातील उत्पादन घटले आहे.

मूळ बातमी

COMMENTS