जर्मनीत घटक पक्षांचे सरकार, मर्केल यांना धक्का

जर्मनीत घटक पक्षांचे सरकार, मर्केल यांना धक्का

जर्मनीच्या सार्वत्रिक निवडणुकांत अंजेला मर्केल यांच्या नेतृत्वाखालील सीडीयू/सीएसयू या घटक दलाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. देशातील सोशल डेमोक्रेट

बायडेन विजयाच्या नजीक; सिक्रेट सर्व्हिसचे संरक्षण
ग्रामपंचायत निवडणुका : लोकशाहीचा उत्सव की जातीचे राजकारण?
लोक आपला कौल मागे घेतात तेव्हा

जर्मनीच्या सार्वत्रिक निवडणुकांत अंजेला मर्केल यांच्या नेतृत्वाखालील सीडीयू/सीएसयू या घटक दलाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. देशातील सोशल डेमोक्रेट्स (एसपीडी)ने २५.७ टक्के मते मिळवत निसटता विजय मिळवला आहे. सत्ताधारी सीडीयू/सीएसयूला २४.१ टक्का मते मिळाली आहेत. तर ग्रीन्स पार्टीने ऐतिहासिक कामगिरी करत १४.८ टक्के मते मिळवत तिसरे स्थान पटकवले आहे.

आता कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत न मिळाल्याने ग्रीन्स व लिबरल पक्षांच्या मदतीने एसपीडीला सत्ता स्थापन करावी लागणार आहे. एसपीडीचे प्रमुख नेते ओलाफ शल्ट्स यांनी आपल्या पक्षाला पूर्ण बहुमत मिळेल असा दावा केला आहे. मतदानाची पूर्ण मोजणी झाली नसल्याने अंतिम आकडा अद्याप हाती आलेला नाही.

एसपीडीने आघाडी घेतली असली तरी घटक दलाच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन होत नाही तोपर्यंत अँजेला मर्केल जर्मनीच्या चॅन्सलर म्हणून काम पाहतील. नवे सरकार स्थापन होण्याची प्रक्रिया ख्रिसमसपर्यंत चालेल.

आपण पुन्हा चॅन्सलर होणार नाही, असे मर्केल यांनी या आधीच जाहीर केले आहे.

जर्मनीची ही निवडणूक हवामान बदल (क्लायमेट चेंज) विषयावर केंद्रीत झाली होती. त्यामुळे या मुद्द्यासह जर्मनीची अर्थव्यवस्था अधिक वेगवान करण्यासाठी नव्या सरकारला धोरणे आखावी लागणार आहेत. नवे सरकार पुढील ४ वर्षे सत्तेवर राहील.

नव्या सरकारला ग्रीन्स व लिबरलचा पाठिंबा आवश्यक आहे. ग्रीन्स पक्षाने जर्मनीवरच्या कर्जाचा मुद्दा निवडणुकांत मांडला होता. तर लिबरल पक्षाने गुंतवणुकीचा मुद्दा हाती घेतला होता. या दोन पक्षांची लोकप्रियता वय वर्ष ३० च्या आतील मतदारांमध्ये अधिक आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0